आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण
सुविचार
ज्ञान उड्या मारत नाही, पायरी पायरीने पुढे जाते
आज काय घडले :
१७८९ मध्ये पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. तसेच सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
१८६७ मध्ये आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
२००३ मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
२०१३ मध्ये डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. १८५४ मध्ये ही सेवा सुरु झाली होती.
आज यांचा जन्म
थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा १८५६ मध्ये जन्म झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक होते.
महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा १८८४ मध्ये जन्म झाला.
उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा १९०२ मध्ये जन्म झाला.
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा १९२० मध्ये जन्म झाला. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.
आज यांची पुण्यतिथी
भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे १९३६ मध्ये निधन झाले.
योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे १९३६ मध्ये निधन झाले. डिव्हाइन लाइफ सोसायटीचे ते संस्थापक होते.
सत्तरच्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचे १९७५ मध्ये निधन झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस यांचे २००३ मध्ये निधन झाले. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जू भैय्या यांचे २००३ मध्ये निधन झाले. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.
भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे २००८ मध्ये निधन झाले. २२ फेब्रुवारी १९७८ पासून ११ जुलै १९८५ या काळात ते सरन्यायाधीश होते.