Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : मुंबईत एकामागे एक तीन बॉंबस्फोट

विष्णू भातखंडे यांचा जन्म, इंदिरा संत यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो, तोच खरा मनाचा "आत्मविश्वास"

आज काय घडले

  • १६६० मध्ये पावनखिंडची लढाई झाली. बाजीप्रभु देशपांडे आणि आदिलशाहचा सेनापती सिद्दी मसूद यांच्यात विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराच्या कडेला हे युद्ध झाले. शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला बाजीप्रभुंनी खिंडीत रोखून ठेवले.

  • १८०३ मध्ये राजा राममोहन राय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या पाच विद्यार्ध्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली.

  • १९२९ मध्ये लाहोर येथील तुरुंगात असतांना क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली.

  • २०११ मध्ये मुंबईत एकामागे एक तीन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला तर १३० पेक्षा जास्त जण जखमी झाले.

Dinvishesh
आज काय घडले : पानशेत, खडकवासला धरण फुटले

आज यांचा जन्म

  • जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा १८९२ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा १९३० मध्ये जन्म झाला.

  • भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा १९६४ मध्ये जन्म झाला.

  • आग्रा परंपरेतले एक गायक विष्णू नारायण भातखंडे यांचा १९९४ मध्ये जन्म झाला. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

Dinvishesh
आज काय घडले : लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा

आज यांची पुण्यतिथी

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशापूर्ण देवी यांचे १९९५ मध्ये निधन झाले.

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे २००९ मध्ये निधन झाले. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com