दिनविशेष 12 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 12 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 12 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमीतास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.

१९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.

१९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.

१९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.

१९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

१९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

१९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

आज यांचा जन्म

१९६३: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस - भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट (निधन: २० ऑगस्ट २०२२)

१९६१: नादिया कोमानेसी - रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती

१९४७: नीरद महापात्रा - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (निधन: १९ फेब्रुवारी २०१५)

१९४०: अमजद खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (निधन: २७ जुलै १९९२)

१९३४: दिलीप महालानाबिस - भारतीय बालरोगतज्ञ (निधन: १६ ऑक्टोबर २०२२)

१९०४: एस. एम. जोशी - समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार (निधन: १ एप्रिल १९८९)

१९०४: श्रीधर महादेव जोशी - संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (निधन: १ एप्रिल १९८९)

१८९६: डॉ. सलिम अली - बर्डमॅन ऑफ इंडिया - पद्म भूषण (निधन: २० जून १९८७)

१८८९: डेव्हिट वॅलेस - रीडर डायजेस्टचे सह्संथापक (निधन: ३० ऑगस्ट १९८१)

१८८०: सेनापती बापट - सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक (निधन: २८ नोव्हेंबर १९६७)

१८६६: सन यट-सेन - चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष (निधन: १२ मार्च १९२५)

१८१७: बहाउल्ला - बहाई पंथाचे संस्थापक (निधन: २९ मे १८९२)

१६०६: जीन मॅन्स - फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका (निधन: १८ जून १६७३)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: असिफ बसरा - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २७ जुलै १९६७)

२०१४: रवी चोप्रा - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

२००७: के. सी. इब्राहिम - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २६ जानेवारी १९१९)

२००५: प्रा. मधु दंडवते - माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते (जन्म: २१ जानेवारी १९२४)

१९९७: विनायक भट्ट घैसास गुरुजी - वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य

१९६५: ताहेर सैफुद्दीन - भारतीय धर्मगुरू (जन्म: ४ ऑगस्ट १८८८)

१९५९: बाळूकाका कानिटकर - अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

१९५९: केशवराव मारुतराव जेधे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते (जन्म: ९ मे १८८६)

१९४६: पं. मदन मोहन मालवीय - बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com