Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : पानशेत, खडकवासला धरण फुटले

संजय मांजरेकर यांचा जन्म, अभिनेते प्राण यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्की गाठतात.

आज काय घडले

  • १७९९ मध्ये शिख साम्राज्याचे शासक महाराजा रणजितसिंग यांनी लाहोरवर ताबा मिळवला व ते पंजाबचे नवीन सम्राट बनले.

  • १९६१ मध्ये पुण्यातील पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली. यामुळे आलेल्या पुरात २ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.

  • १९८२ मध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना झाली. ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा ही बँक करते.

  • १९८५ मध्ये पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १२ जुलै १९८५ ते २० डिसेंबर १९८६ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

  • १९९५ मध्ये अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

  • १९९९ मध्ये भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Dinvishesh
आज काय घडले : आंग सान सू क्यी यांची सुटका

आज यांचा जन्म

  • अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा १९६४ मध्ये जन्म झाला.

  • चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा १९०९ मध्ये जन्म झाला. १९५५ साली त्यांचा देवदास हा चित्रपट खुपच गाजला होता.

  • सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा १९२० मध्ये जन्म झाला.

  • क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा १९६५ मध्ये जन्म झाला.

Dinvishesh
आज काय घडले : लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा

आज यांची पुण्यतिथी

  • हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

  • हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे १९९९ मध्ये निधन झाले. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट केले.

  • भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू, अभिनेता व माजी राज्यसभा सदस्य दारासिंह रंधावा यांचे २०१२ मध्ये निधन झाले.

  • चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे २०१३ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com