श्रीदत्त जयंतीनिमित्त 'या' खास शुभेच्छा शेअर करुन दिवस करा मंगलमय

श्रीदत्त जयंतीनिमित्त 'या' खास शुभेच्छा शेअर करुन दिवस करा मंगलमय

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीचा सोहळा केला जातो. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात.
Published on

Datta Jayanti Wishes 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीचा सोहळा केला जातो. यानुसार 26 डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने दत्तगुरुंचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दत्त जयंतीनिमित्त तुम्ही प्रियजनांना अथवा सोशल मीडियावर खास स्टेटस ठेवू शकता.

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,

हरपले मन झाले उन्मन

मी तूपणाची झाली बोळवण,

एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा

नेति नेति शब्द न ये अनुमाना

सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः

गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूवीण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट !

दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com