BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मेगाभरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मेगाभरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

बीईएल पात्र उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड करेल.
Published on

BEL Recruitment 2023 : बीईएलमध्ये अनेक पदांवर भरती करण्यात येत आहे. Bharat Electronics Limited (BEL) प्रशिक्षणार्थी अभियंता-I आणि प्रकल्प अभियंता-I या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. पात्र उमेदवार प्रशिक्षणार्थी अभियंता-I आणि प्रकल्प अभियंता-I भरतीसाठी 24 जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. बीईएल पात्र उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड करेल.

पात्रता

प्रशिक्षणार्थी अभियंता-I आणि प्रकल्प अभियंता-I या पदांसाठी 1 जुलै 2023 रोजी कमाल वयोमर्यादा किमान 28 वर्षे आणि कमाल 32 वर्षे आहे. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित अभियांत्रिकी शाखेतील बीई किंवा बीटेक पदवी असावी.

पगार

अधिकृत माहितीनुसार, बीईएल भरतीद्वारे एकूण 205 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 191 जागा प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदासाठी आहेत आणि 14 जागा प्रकल्प अभियंता-I पदासाठी आहेत. प्रशिक्षणार्थी अभियंता-I यासाठी 30 ते 40 हजार वेतन देण्यात येईल. तर, प्रकल्प अभियंता-I यासाठी 40 ते 50 हजार वेतन दिले जाईल.

कसा कराल अर्ज?

बीईएल भर्ती 2023 साठी उमेदवार ऑनलाईन करु शकतात. पात्र उमेदवारांनी BEL bel-india.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे या भरतीसाठी अर्ज करावा. यासाठी अभियंता पदासाठी उमेदवाराला ४७२ रुपये तर प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी १७७ रुपये भरावे लागतील. SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही हे लक्षात ठेवा. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट देखील तपासू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com