महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' प्रेरणादायी विचार शेअर करून महामानवाला करा अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' प्रेरणादायी विचार शेअर करून महामानवाला करा अभिवादन

दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त सोशल मीडिया स्टेटसवर बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार ठेवून अभिवादन करा.
Published on

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvas Divas : डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हंटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ तत्वज्ञ, समाजसुधारक होते. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, संविधान अशी महान कार्ये केली. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त सोशल मीडिया स्टेटसवर बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार ठेवून अभिवादन करा.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण हे वाघिणीचे दुध जो पितो तो गुगुरल्या शिवाय राहत नाही

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,

तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com