Babasaheb Ambedkar Jayanti Speech: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द्या 'हे' सोपे भाषण
14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडगारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चंदनापरिस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी भाषणास सुरुवात करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना "अस्पृश्य' म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.
बाबासाहेब चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले 'भगवान बुद्धाचे चारित्र्य' हे पुस्तक वाचण्यास दिले. पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आम्हांला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही? फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ का वाचण्यास दिले त्यात शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव. वडीलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले. कर्ण - द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे तसेच वाल्मीकी हे कोळी असून रामायणाचा कर्ता झाले .
वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुध्दांकडील प्रवास सुरु झाला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानव ज्ञानसवांदी तपस्वी, अमोध वकृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती, चैतन्य देत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म ,आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला...