Akshaya Tritiya 2022 :50 वर्षांनंतर अक्षया तृतीयेला आहे खास योग, करू शकता कोणतेही शुभ कार्य
स्त्रिया ज्यादिवसाची वाट पाहतात तो दिवस म्हणजे अक्षया तृतीया (Akshaya Tritiya). या दिवसाचे विशेष कारण आहे ते म्हणजे या दिवशी महिला सोने-चांदी खरेदी करायचे असते. यावेळी अक्षया तृतीया 3 मेला आहे. जोतिषांच्या मते अक्षया तृतीयेचा यावेळी दुर्मिळ योग आहे. तर चला जाणून घेऊया की यावेळी कोणते शुभ योग आहेत आणि त्याचे काय महत्त्व आहे.
वैशाख महिन्यानूसार हिंदू धर्मात हा दिवस अक्षया तृतीया म्हणून साजरा केला जातो. अबुझा मुहूर्त म्हणून हा दिवस पाळला जातो. अक्षय तृतीयेला खरेदी आणि दान देखील अक्षय पुण्य स्वरूपात केले जात असते, असे म्हटले आहे. अक्षय तृतीया ही रोहिणी नक्षत्र आणि शोभन योग यावेळी साजरी केली जाते. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवस मंगळ रोहिणी योग म्हणून तयार होणार आहे. यादिवशी दोन प्रमुख ग्रह स्वत:मध्ये असून आणि 2 प्रमुख उच्च ग्रह राशीत बसतील. ग्रहांचा हा विशेष योग 5 दशकांनंतर तयार होत असल्याचे मानले जात आहे.
50 वर्षांनंतर अक्षया तृतीयेला होणारा ग्रहांचा संयोग असा आहे की, शुक्र मीन राशीत तर चंद्र वृषभ राशीत असणार आहे. तसेच शनी हा कुंभ राशीत असेल तर गुरू हा मीन राशीत असेल. अनुकूल स्थितीत चार मोठे ग्रह असणे हा दुर्मिळ योग आहे, असे ज्योतिष शास्त्र तज्ज्ञांच्या मते मानले जाते. जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करण्याच्या प्रतिक्षेत असाल तर यावेळी अक्षया तृतीयेला पुर्ण करू शकता. हा दिवस शुभ असून शुभ फल मिळेल.