Ashadhi Ekadashi Wishes : विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालती वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार आषाढ महिन्यात येणारी आषाढी एकादशीची रात्र देवांची रात्र म्हणून ओळखली जाते. वारकरी सांप्रदाय ज्यांना वैष्णव देखील म्हटले जाते, या वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. पंढरपूरात दाखल झालेले वारकरी १७ जुलै रोजी विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या भक्तीत पांडुरंगमय होतात.
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे...
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिसे रिंगण टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आवडे हे रूप गोजिरे सगुण,
पाहतां लोचन सुखावले...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी...
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!