Vinayak Chaturthi 2023: आषाढी विनायक चतुर्थी उद्या; जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

Vinayak Chaturthi 2023: आषाढी विनायक चतुर्थी उद्या; जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

हिंदू धर्मात विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते
Published on

Vinayak Chaturthi 2023: हिंदू धर्मात विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. या महिन्यात आषाढ महिन्याची चतुर्थी साजरी केली जात आहे. जी आषाढ विनायक चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी या नावांनी ओळखली जाते. श्रद्धेनुसार विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा केली जाते.

असे म्हटले जाते की चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने गणपतीची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी उपवास केल्याने भक्तांच्या जीवनात सुख, संपत्ती, वैभव, समृद्धी आणि कीर्ती येऊ लागते. यंदा आषाढ विनायक चतुर्थी 22 जून रोजी साजरी होत आहे.

Vinayak Chaturthi 2023: आषाढी विनायक चतुर्थी उद्या; जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी
Shrawan Somwar 2023 : 19 वर्षांनंतर श्रावणात दुर्मिळ योगायोग; भाविकांवर होणार कृपेचा वर्षाव

विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बुधवार २१ जून रोजी दुपारी ३.०९ वाजता सुरू होत असून ही तिथी गुरुवार २२ जून रोजी सायंकाळी ५.२७ वाजता समाप्त होईल. 22 जून रोजी सकाळी 10.59 ते दुपारी 1.47 पर्यंत विनायक गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सांगण्यात आला आहे. मान्यतेनुसार या शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात.

आषाढ विनायक चतुर्थीला पूजा करण्यासाठी लोक सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात आणि स्वच्छ कपडे घालतात. भाविक उपवासाचा संकल्प घेतात. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पूजेसाठी आसनावर सजवली जाते. असे म्हणतात की ज्यांना कर्जातून मुक्ती हवी आहे त्यांनी उंदरावर स्वार असलेल्या गणपतीची मूर्ती किंवा चित्र आणून त्याची पूजा (गणेशपूजा) करावी. आर्थिक विवंचनेने त्रासलेले लोक या पूजेत गोल दिवा लावू शकतात.

दुर्वा, नारळ, कुंकु आणि हळद प्रथम गणपतीला अर्पण केले जाते. नैवेद्यामध्ये मोदक अर्पण करून गणपती बाप्पाचा १०८ वेळा जप करणे शुभ मानले जाते. शेवटी आरती करून गायीला चारा अर्पण करणे शुभ आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन शुभ मानले जात नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com