लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त 'हे' अनमोल विचार ठेवा स्टेटसला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त 'हे' अनमोल विचार ठेवा स्टेटसला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते
Published on

Annabhau Sathe Birth Anniversary : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे स्टेटस ठेवून अभिवादन करा.

अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

तू उठ आता सत्वर, हे तुडवून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर, तुझी तू शांतिध्वजा सत्वर

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची

इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला

अन्यायाचा कडेलोट केला ||जी||

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com