पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त 'या' खास स्टेटसद्वारे करा अभिवादन
Ahilyabai Holkar Punyatithi 2023 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून ओळखल्या जातात. भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं. अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करीत असताना सर्वांसाठी समान कायदा ही भूमिका अगदी त्या काळापासूनच घेतलेले आपल्याला दिसते. अशा अहिल्यादेवींच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास मेसेज सोशल मीडियामध्ये शेअर करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करा.
लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या,
दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण,
बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई ना त्रिवार वंदन
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,
तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता,
कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता,
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
इंग्रजांनाही दाद न देण्याची
जिद्दच त्यांची न्यारी होती,
राणी असूनही वेगळी जिची छाप होती,
अशी राणी अहिल्याबाई होती!!!
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
घाट, मंदिरे विहिरी बांधल्या,
समान तिला रंक नि राव,
लोकांसाठी देह झिजवि,
अहिल्याबाई होळकर तिचे नाव।
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन