लोकशाही स्पेशल
15 ऑगस्ट व 26 जानेवारी दिवशीच्या ध्वजारोहणातील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स
लोकशाही न्यूज नेटवर्क | प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे? चला तर मग जाणून घेऊ…
- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी झेंडा खालून दोरीच्या साहाय्याने वर नेतात,नंतर उघडून फडकवतात.ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात.
- 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला झेंडा वरच बांधतात, ज्याला उघडून फडकविले जातात घटनेत ह्याला झेंडा फडकविणे म्हणतात.
- 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
- स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण करतात.
- प्रजासत्ताक दिनी देश आपले लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक गुणांना दाखवतात.परंतु स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.
- 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख पाहुणे येतात. परंतु स्वातंत्र्य दिनी असे काही होत नाही.
- 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणतात.