दिनविशेष 22 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 22 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००७: सुनिता विल्यम - या सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परतल्या.
१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण.
१९९०: शीतयुद्ध - चेकपॉईंट चार्ली बर्लिनमध्ये उद्ध्वस्त केले गेले.
१९८६: हॅंड ऑफ गॉड गोल - अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील १९८६ फिफा विश्वचषक सामन्याच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोनाने केलेला प्रसिद्ध हॅंड ऑफ गॉड गोल.
१९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेज - पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाले.
१९७८: कॅरॉन, प्लूटोचा पहिला उपग्रह शोधण्यात आला.
१९७६: कॅनडा - देशाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
१९४८: युनायटेड किंगडममधील आधुनिक इमिग्रेशन - एचएमटी एम्पायर विंड्रश या जहाजाने ८०२ वेस्ट इंडियन स्थलांतरितांचा पहिला गट आणला.
१९४८: ब्रिटनने भारतावरील राज्यकारभार सोडल्याच्या अर्ध्या वर्षानंतर राजा जॉर्ज (सहावा) यांनी औपचारिकपणे भारताचा सम्राट ही पदवी सोडली.
१९४५: दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई: संपली.
१९४४: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बॅग्रेश: सुरवात.
१९४२: अमेरिका - काँग्रेसने औपचारिकपणे निष्ठेची प्रतिज्ञा स्वीकारली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
आज यांचा जन्म
१९७४: विजय - भारतीय अभिनेते
१९५०: टॉम अल्टर - भारतीय अभिनेते - पद्मश्री (निधन: २९ सप्टेंबर २०१७)
१९३२: अमरीश पुरी - ज्येष्ठ भारतीय अभिनेते (निधन: १२ जानेवारी २००५)
१९०८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते - महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: ९ एप्रिल १९९८)
१८९९: रिचर्ड गिर्ली ड्र्यू - मास्किंग टेपचे शोधक (निधन: १४ डिसेंबर १९८०)
१८९६: बाबुराव पेंढारकर - नटश्रेष्ठ
१८८७: ज्यूलियन हक्सले - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (निधन: १४ फेब्रुवारी १९७५)
१८०५: जोसेफ मॅझिनी - इटालियन स्वातंत्र्यवीर (निधन: १० मार्च १८७२)
आज यांची पुण्यतिथी
२०१४: रामा नारायणन - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ३ एप्रिल १९४९)
१९९४: एल. व्ही. प्रसाद - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)
१९९३: विष्णूपंत जोग - चित्रपट अभिनेते
१९५५: सदाशिव शिंदे - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)