दिनविशेष 18 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 18 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 18 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.

२००९: श्रीलंका - सरकार-एलटीटीई यांच्यातील युद्ध एलटीटीईला पराभूत करून संपले.

१९९८: सुरेन्द्र चव्हाण - जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.

१९९५: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - स्थानिक बँकेतील ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा देण्यात आली.

१९९१: हेलन शेरमन - ह्या पहिल्या महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनल्या.

१९९०: फ्रान्स देशातील टीजीव्ही रेल्वेने ५१५.३ किमीताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

१९७४: स्मायलींग बुद्धा - भारत देशाने पहिल्या आण्विक अस्त्राची यशस्वी चाचणी पोखरण, राजस्थान येथे केली. या मिशनचे नाव स्मायलींग बुद्धा असे होते.

१९७२: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - सुरवात.

१९३८: गोपालकृष्ण हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला श्री पुंडलिक हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला.

१८०४: नेपोलिअन बोनापार्ट - फ्रान्सचे सम्राट बनले.

आज यांचा जन्म

१९७९: जेन्स बर्गेनस्टेन - माईनक्राफ्टचे सह-डिझाइन, स्वीडिश व्हिडिओ गेम डिझायनर

१९३३: एच. डी. देवेगौडा - भारताचे ११वे पंतप्रधान

१९२५: इग्नेशियस पॉल पिंटो - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (निधन: ८ फेब्रुवारी २०२३)

१९२०: करोल जोझेफ वोजट्यला - पोप जॉन पॉल (दुसरे), २६४वे पोप (निधन: २ एप्रिल २००५)

१९२०: जॉन पॉल (दुसरा) - पोप (निधन: २ एप्रिल २००५)

१९१३: पुरुषोत्तम काकोडकर - गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते (निधन: २ मे १९९८)

१९०९: व्हिन्सेंट डु विग्नॉड - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: ११ डिसेंबर १९७८)

१८९५: ऑगस्टो सँडिनो - निकाराग्वा देशाचे क्रांतिकारक (निधन: २१ फेब्रुवारी १९३४)

१८७२: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (निधन: २ फेब्रुवारी १९७०)

१८७२: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: २ फेब्रुवारी १९७०)

१६८२: छत्रपती शाहू महाराज (पहिले) - मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती (निधन: १५ डिसेंबर १७४९)

१०४८: ओमर खय्याम - पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (निधन: ४ डिसेंबर ११३१)

आज यांची पुण्यतिथी

२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)

२०१४: डोब्रिका कोसिक - फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १९२१)

२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

२००७: पियरे-गिल्स डी जेनेस - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ ऑक्टोबर १९३२)

१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)

१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)

१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com