Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

Sanjay Raut : बाजारातील विकल्या गेलेल्या घोड्यांची यादी आमच्याकडे

महाविकास आघाडीतील कोणतेही मत फुटले नाही; राऊतांचे स्पष्टीकरण
Published on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) कोणतेही मत फुटले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर अपक्षांनी दगबाजी केली. बाजारातील विकल्या गेलेल्या घोड्यांची यादी आमच्याकडे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Sanjay Raut
Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवला

संजय राऊत म्हणाले की, घोडेबाजारामध्ये जी लोकं उभी होती. त्यांची सहा-सात मते आम्हाला मिळाली नाहीत. आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही. कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत. वसईचे हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाही. देवेंद्र भुयार यांची मदत देखील आम्हाला मिळाली नाहीत, असे उघडपणे त्यांनी सांगितले.

आम्ही व्यापार केला नाही. त्यांना पहाटेची सवय आहे. त्यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा म्हणत राऊतांनी भाजपच्या पहाटेच्या शपथविधीवरुन टोला लगावला आहे.

Sanjay Raut
संजय राऊतांना न्यायालयाचे हजर राहण्याचे समन्स

तर, राज्यसभेत भाजपच्या विजयानंतर आता महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा विधाने राजकीय पटलावरुन केली जात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, घोडे बाजारातील या घोड्यांमुळे कुठल्याही सरकारला धोका होत नाही. घोडे येथे असतात तसेच तिथे देखील असतील जिथे हरभरे टाकतील तिथे जातात. गेली अडीच वर्ष आम्ही काऊंटडाऊन ऐकतच आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut
प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी

राज्यसभेत अतिरीक्त मतांच्या जोरावर संजय पवार यांना शिवसेनेने राज्यसभेच्या रिंगणात उतरविले होते. परंतु, पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. यावर संजय राऊत म्हंटले की, 42 नक्कीच ते धाडस होतं आमचा हा आकडा होता. परंतु, समोरच्याने ताकद व केंद्रीय तपास यंत्रणांचा ताकद वापरून घोडेबाजार केला. महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद ठाकरे सरकार देखील घेत आहे. मी माझ्या पक्षाने दिलेल्या 42 मतांवर लढत होतो. त्यातलं एक मत माझं बाद केलंकाही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते. पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.

संजय पवार यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, संजय पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पराभवामुळे मुख्यमंत्री देखील व्यतीत झाले आहेत अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्षश्रेष्ठी ठेवत असतो.

Sanjay Raut
Sambhaji Raje : वाघाचे कातडे पांघारल्यानंतर वाघासारखे दिसता येते, पण...

संभाजी राजेंचा शिवसेनेने अपमान केला असा आरोप भाजपने केला होता. तुम्ही दुसऱ्याची फळ चाखत बसलेले आहेत तुम्ही त्यांना का उमेदवारी दिली नाही. तुमचं राजेंवर इतकं प्रेम होतं तर धनंजय महाडिक यांच्या जागेवर त्यांना निवडून आणले पाहिजे होतं, अशी टीका त्यांनी भाजपवर केले आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणुकीही जवळ आली असून भाजपसमोर राष्ट्रवादीचे आव्हान असणार आहे. दोन्हीही पक्षांनी अतिरीक्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे, या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेस देखील एक उमेदवार निवडून येईल, अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com