mim asaduddin owaisi
mim asaduddin owaisiTeam Lokshahi

Rajya Sabha Election : एमआयएमचा मविआ पाठिंबा, या उमेदवारास करणार मतदान

लोकशाहीवर वाचा सर्व अपडेट : मतमोजणीला संध्याकाळी पाच वाजता सुरुवात, ७ वाजेपर्यंत सर्व निकाल येणार
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असतांना महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असुवुदीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील टि्वट खासदार इन्मियाज जलील यांनी केले आहे.

mim asaduddin owaisi
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कोटा कमी, आता असे असेल गणित

दुसऱ्या एका ट्विटमध्ये या निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना मतदान करणार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा असे म्हटले आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख Anil Deshmukh) यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न सुरु आहेत़.यासंदर्भात ११ वाजता उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरही साथ देण्याबाबत भीती आहे.

सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच लढाई सुरु आहे. विजयासाठी ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.

भाजपने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपसाठी अधिक फायद्याचे असेल. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे.

उमेदवार :संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)

आमदारांचे संख्याबळ

१०६ भाजप

५५ शिवसेना

५३ राष्ट्रवादी

४४ काँग्रेस

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com