Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेचा पत्ता कट, भाजपची नावे जाहीर
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी (vidhan parishad election)भाजपने आपली नावे जाहीर केली आहेत. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांचा नाव कापले गेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नावाची घोषणा केली. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि मी खूप प्रयत्न केले. परंतु केंद्रीय समितीने पंकजा मुंडे यांच्यांसाठी काही वेगळा विचार केला असणार असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी केले.
केंद्रीय समितीने नावे जाहीर केली आहेत.
प्रवीण दरेकर
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे
प्रशांत लाड
शिवसेनेने विधान परिषदेसाठीही आतापासूनच तयारीला लागली आहे. शिवसेनेकडून (Shivsena) विधान परिषदेसाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहे. सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.
विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. दरम्यान, आमशा पाडवी हे नंदुरबार येथील शिवसेना नेते आहेत.