Nana Patole : भाजपने संभाजी राजेंचा राजकीय खून केला
नागपूर : शाहू राजे छत्रपती (Shahu Raje) यांच्या वक्तव्यानंतर शिवसेने-भाजपमध्ये (Shivsena-Bjp) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहू राजे यांनी कालच भारतीय जनता पार्टीने संभाजी राजेंचा (Sambhaji Raje) राजकीय खून केला. संभाजी राजेंची कोंडी केली अशाच पद्धतीचे वक्तव्य केल्याची नाना पटोले यांनी टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, शाहू राजे यांनी कालच भारतीय जनता पार्टीने संभाजी महाराजांचा राजकीय खून केला, अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे तोटा नफा कोणाचा होणार आहे हे भविष्य सांगेल. ज्यांनी ठरवून या पद्धतीचा प्रयत्न केला. त्याचे वर्णन श्रीमंत शाहू महाराजांनी कालच केले. फडणवीस यांच्या वक्तव्यावर पटोले यांनी टीका केली.
संभाजी महाराजांची कोंडी केली. यासाठी संभाजी महाराजांचे वडील भारतीय जनता पार्टीचे नाव घेत आहे. फडणवीस, शरद पवारांचे नाव घेत आहे. शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय संबंध आहे मला माहित नाही त्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते शाहू राजे?
संभाजीराजे भोसले अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची खेळी असल्याचा धक्कादायक दावा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे यांनी केला होता. खासदारकीची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे फडणवीस यांच्याकडे गेले होते व अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यात काय बोलणं झालं हे माहित नाही. तुम्ही अपक्ष राहिला तर आम्ही पाठिंबा देतो, असे कदाचित सुचवलं असेल. फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेच संभाजीराजेंनी पक्षांची घोषणा केली हे लिंक केलं पाहिजे, असेही शाहू राजेंनी म्हंटले होते.