Chandrakant Patil | संजय राऊतांना कोर्टात का कुणी खेचत नाही?
मुंबई : जे जे अनैतिक आहे ते ते करण्याचा प्रयत्न संजय राऊत (Sanjay Raut) करतात. संजय राऊत यांना का कुणी कोर्टात खेचत नाही, अशी टीका भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे असल्याने कारवाई करण्यात आली आहे. घटनेवर अविश्वास व्यक्त करण्यासाठी आम्ही मविआचे कार्यकर्ते नाहीत. जवळजवळ सर्व केसेस न्यायालयात टिकल्या आहेत. तसेच, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप न्यायालयानेही नाकारले नाहीत.
शिवसेना-भाजपमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात आहे. जे जे अनैतिक आहे ते ते करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात. संजय राऊत यांना का कुणी कोर्टात खेचत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना स्त्रीद्वेषी असल्याचे म्हंटले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात रहायला शिका. ग्रामीण भागातल्या काही म्हणी आहे. महिलेला आदर देण्याचा माझा स्वभाव आहे. तसा सुप्रिया ताईंबद्दलही आदरच आहे. मी त्यांच्याशी बोलत असतो, असे स्पष्टीकरण पाटलांनी दिले.
लोकशाहीमध्ये सर्व तयारी ठेवायची असते. कोण कोणाला मसनात पाठवेल हे वेळ आल्यावर जनता ठरवेल, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघााडीवर केली आहे. तर, संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी होणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला होता. परंतु, जास्त विश्वास ठेवू नये कधी कधी विश्वासतली पहिली जागा देखील पडू शकते, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला.