Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

Shivsena : राऊत अन् पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

आम्ही विश्वासघात करतोय तर छत्रपतींसाठी भाजपने स्वतःची ४२ मते द्यावी : राऊत
Published on

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेनेत (Shivsena) येण्यास नकार दिला. यानंतर शिवसेनेने अखेर आपली उमेदवारी संजय पवार यांना जाहीर केली आहे. दरम्यान, उद्या 26 मे रोजी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Sanjay Raut
मोदी सरकारची कामगिरी आहे कशी? आपले मत नोंदवा

'आमच्याकडे मतांचा कोटा अधिक'

संजय राऊत म्हणाले की, मी आणि संजय पवार उद्या 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधील नेते उपस्थित राहणार आहेत. आमच्याकडे मतांचा कोटा हा अधिक आहे. संभाजीराजेंबाबत विचारले असता राऊत यांनी संजय पवार शिवसैनिक आहे ते आमचे उमेदवार आहेत. छत्रपती यांच्या विषयी माझ्याकडे माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

'आम्ही विश्वासघात करतोय तर...'

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने नाराज समर्थक आणि राजकीय नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेनेवर सातत्याने करण्यात येत होता. ते म्हणाले की, आम्ही संभाजी राजेंना आमची ४२ मते द्यायला तयार होतो. यात कोणता विश्वासघात केला. कुणाला असं वाटत असेल कि आम्ही विश्वासघात करतोय तर त्यांनी छत्रपतींसाठी ४२ मते गोळा करावी. राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेची आहे, अपक्षांची नाही. यासाठी लागणारी मतेही शिवसेनेची आहेत, अपक्षाची नाहीत. तर आमची ४२ मते अपक्ष उमेदवाराला कसे देणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
यासीन मलिकच्या शिक्षेस इम्रान खानचा विरोध

आम्ही विश्वासघात करतोय तर छत्रपतींसाठी भाजपने स्वतःची ४२ मते द्यावी : राऊत

जर शिवसेनेला भडकवण्याचा विडा कुणी उचलला असेल तर त्याची अवस्था चांगली होणार नाही. भाजपाला असे वाटत असेल कि संभाजी राजेंनी अपक्ष म्हणून यावे तर त्यांनी त्यांची स्वतःची ४२ मते द्यावी, असा सल्लाही संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते अनिल परब वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sanjay Raut
OBC Reservation | पाच वर्षे सत्ता असताना झोपले होता का? पवारांचा सवाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com