sambhaji raje uddhav thackeray
sambhaji raje uddhav thackerayTeam lokshahi

Sambhaji Raje : संभाजीराजेंचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकारच?

शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं निमंत्रण धुडकावले?
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje) खासदार व्हायचे असेल तर त्यांना शिवबंधन बांधावे, अशी अटच शिवसेनेने (Shivsena) ठेवली आहे. यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज संभाजीराजेंची भेट घेऊन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत शिवसेनेत प्रवेश करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांचा निरोप दिला आहे. परंतु, संभाजीराजेंनी प्रवेश करण्यास नकार दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळली आहे.

sambhaji raje uddhav thackeray
अयोध्येतला ट्रॅप, सेना, राणा ते थेट अफजल खानाची कबर...राज ठाकरेंच्या भाषणातील 7 मुद्दे

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. संभाजीराजे यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. यामध्ये शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा समावेश शिष्टमंडळामध्ये होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही छत्रपती संभाजीराजे यांच्याशी फोनवरून शिवबंधन बांधण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.

sambhaji raje uddhav thackeray
Devendra Fadnavis : 'ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टाच'

वर्षा निवास्थानी उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे उद्धव ठाकरे यांचा निरोप शिवसेना शिष्टमंडळाने संभाजीराजे यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश करावा. तरच संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

sambhaji raje uddhav thackeray
राज ठाकरे हिंदुत्ववादी कधीपासून झाले? राऊतांचा प्रश्न

संभाजीराजेंनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण अद्याप स्वीकारले नसून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. तर संभाजीराजेंनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com