राहुरी कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना डावलले

राहुरी कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना डावलले

Published by :
Published on

कुणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | महात्मा फुले कृषी विद्यापीठ उभारण्यात सिंहाचा वाटा असलेले डॉ.बाबुराव तनपूरे यांचे नातू व राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे (Prajakt Tanpure) यांना विद्यापीठ स्थापना दिनाच्या निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले. त्यामुळे तालूक्यातील जनतेतून विद्यापीठ प्रशासना विरोधात संतापाची लाट पसरली आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ५४ वा (Rahuri Agricultural University) स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. मात्र या पत्रिकेतून स्थानिक राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना डावलण्याचा महा प्रताप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलाय.

डॉ. बाबुराव तनपुरे यांनी विकासाची दुरदृष्टी ठेवून शेतकरी व कामगारांच्या भविष्यासाठी राहुरी येथे विद्यापीठ असावे म्हणून तत्कालीन सरकारकडे आग्रह धरला होता. त्यामुळे राहुरी येथे विद्यापीठाची स्थापना केली.शेतकरी, कामगार, महिला, मजूर, छोटे मोठे कारागीर व उद्योग व्यवसायातून तालुका प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तालुक्यातील सहकाऱ्यां समवेत त्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना दिन कार्यक्रमात डॉ.तनपुरेंचे तिसऱ्या पिढीतील वारसदार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा (Prajakt Tanpure) विसर विद्यापीठाच्या कुलगुरूंना पडला असल्याचे वास्तव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून समोर आले आहे.

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील कुलगुरुपदी नियुक्त झाल्यापासून हे प्रकार घडत आहेत. कुलगुरू डॉ. पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही मंत्री तनपुरे (Prajakt Tanpure) यांना स्थान नव्हते. या कार्यक्रमात कुलगुरूंना व विद्यापीठ प्रशासनाला स्थानिक मंत्र्यांचा विसर पडला असल्याचे दिसुन येते. अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात तालुक्याचे स्थानिक पदाधिकारी राज्यमंत्री तनपुरे यांना निमंत्रीत करणे गरजेचे होते. मात्र विद्यापीठ प्रशासनाने याचा कोणताही विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेमध्ये विद्यापीठ प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com