एकतर्फी कार्यक्रम; भाजपाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास विरोध

एकतर्फी कार्यक्रम; भाजपाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास विरोध

Published by :
Published on

संजय देसाई, सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) स्मारक उद्घाटनाला भाजपाने (BJP) विरोध दर्शवला आहे.सांगली महापालिकेच्या (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) माध्यमातून उभारल्या गेलेल्या स्मारकाचं उद्घाटन सर्वपक्षीय असणे गरजेचे आहे,मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकतर्फी पक्षीय कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत विरोध दर्शवण्यात आला आहे.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) माध्यमातून अडीच कोटी रुपये खर्च करून विजयनगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांचे स्मारक उभारण्यात आला आहे आणि या स्मारकाचं उद्घाटन दोन एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याचे सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी जाहीर केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेला आहे.

मतदाता या उद्घाटन समारंभाला भाजपाने विरोध दर्शवला आहे.महापालिकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे.त्यामुळे महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना यामध्ये विश्वासात घेणे गरजेचे आहे, मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेळावा घेण्यात येत आहेत,ही बाब अत्यंत चुकीची असून हा कार्यक्रम सर्वपक्षीय झाला पाहिजे,आणि ठरवण्यात आलेली उद्घाटनाची तारीख बदलून सर्व पक्षीय नगरसेवकांची चर्चा करून पुन्हा नव्याने उद्घाटनाच्या समारंभाची तारीख जाहीर करावी,अशी मागणी करत,या कार्यक्रमा बाबतीत खासदार संजयकाका पाटील,आमदार गोपीचंद पडळकर, भाजपच्या नेत्यांची व्यापक बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं,सांगली भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारांच्या बैठकीत निर्णय घेत,2 एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला मात्र विरोध दर्शवला आहे, त्यामुळे सांगली महापालिकेच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com