BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच; प्रभाग रचनेचा आराखडा तयार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2022) संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचं (State Election Commission) पालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) तयार केलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत. या पार्श्वभूमीवर आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.
यात ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गातील समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रमासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. आराखड्यानुसार एकूण मुंबईत महापालिका वॉर्ड 236 असतील.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई मनपाला पत्र लिहून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी मनपाच्या प्रारुप रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना मंगळवारी होणार जाहीर. प्रभाग संख्या 111 वरून 122 होणार असून नव्या प्रभाग रचनेकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्यात नवी मुंबई मनपा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका एकुण वार्ड 236
आरक्षण
खुला प्रवर्ग 219
एससी 15
एसटी 2
महिला जागा
खुला प्रवर्ग 118
एससी 8
एसटी 1
निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती, सुनावणी देण्याचा कार्यक्रम कसा असणार?
1 फेब्रुवारी – निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे
1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप आधी सूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी
16 फेब्रुवारी प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे
26 फेब्रुवारी- राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक
2 मार्च – सुनावणी नंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक.