मुंबई : मुंबईसह राज्यात मागील अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोना विषाणूच्या (Corona Virus) चौथ्या लाटेचा (Fourth Wave) धोका निर्माण झाला होता. यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडत होती. अशातच, राज्यासाठी कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले होते. राज्यासह देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सगळ्यांसाठीच डोकेदुखीचा विषय ठरत होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनेही पावले उचलण्यास सुरुवात केली होती. अशातच आता राज्यातून एक चांगली बातमी समोर येत असून राज्य आणि मुंबईतील रुग्णसंख्या २००ने घटल्याचे समोर येत आहे. शनिवारी दिवसभरात २ हजार ९२२ रुग्ण सापडले. तर मुंबईत १ हजार ७४५ रुग्ण सापडले. मात्र, राज्यात आणि मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राील कोरोना रुग्णसंख्या
4 जून - 1357
5 जून -1494
6 जून -1036
7 जून -1881
8 जून - 2701
9 जून - 2813
10 जून - 3081
11 जून - 2922
भारतातील कोरोना रुग्णसंख्या
4 जून - 4270
5 जून -4518
6 जून -3651
7 जून -5233
8 जून -7174
9 जून - 7523
10 जून -8263