Monsoon
Monsoonteam lokshahi

Monsoon Update : हवामान विभागाचा पुन्हा 'अंदाज', महाराष्ट्रात 2 दिवसांत मान्सून धडकणार!

पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली शक्यता
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पावसाच्या (monsoon update) आगमनाकडे लागलं होतं. आज अखेर हवामान खात्याने पुन्हा 'अंदाज' दिला असून, येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचं आगमन होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

पुणे वेधशाळेचे प्रमुखे के एस होसळीकर (K. S. Hoslikar) यांनी माहिती दिली की, पुढील ४८ तासांत,मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा,दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग,कर्नाटक आणखी काही भाग, TN चा उरलेला भाग,दक्षिण AP चा काही भाग,WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल. त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल असेल अशी माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाअभावी कोकणातील भात पिकाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com