ED Notice Anil Parab
ED Notice Anil Parab team lokshahi

Anil Parab यांच्यावर 'ईडी'ची मोठी कारवाई; 7 ठिकाणी छापेमारी

अनिल परब यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसोर्टसह 7 विविध ठिकाणांवर ED तर्फे छापेमारी टाकण्यात आली आहे. तसेच अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. अनिल परब सध्या याचठिकाणी उपस्थित असल्याचे कळते.

ED Notice Anil Parab
Nurses Strike : राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद आंदोलन

यापूर्वीही अनिल परब यांना ईडीचा समन्स

अनिल परब यांना यापूर्वी सुद्धा ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राण्यास सांगितले होते. मात्र, अनिल परब हे त्यावेळी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

ईडीच्या कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तातडीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.निल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे. परब यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केलाय. परब यांचे सर्व काळे कारनामे बाहेर येतील. आता त्यांनी बॅग भरायला घ्यावी, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com