Tiger Waghdoh
Tiger Waghdoh team Lokshahi

Tiger 'Waghdoh' Dies | राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू

१७ वर्षीय वाघडोहने घेतला शेवटचा श्वास
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

चंद्रपूर : अनिल ठाकरे | चंद्रपूरच्या सीनाळा जंगलात सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला. तो 17 वर्षे वयाचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघडोह (Waghdoh) नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता.

Tiger Waghdoh
Sanjay Raut : अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंनी शिवबंधन नाकारल्यावर शिवसेना ठाम

वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता. 21 मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता, तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हीडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सीनाळा जंगलात त्याचा मृतदेह सापडला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

Tiger Waghdoh
Video | मुंबई मनपातील कमिशनचा पर्दाफाश, नगरसेवकापासून ते ज्युनियर इंजिनियर होतात मालामाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com