Varsha gaikwad
Varsha gaikwad

दहावी-बारावीच्या निकालावर वर्षा गायकवाड म्हणाल्या...

Published by :
Published on

राज्यातील दहावी-बारवीच्या (SSC-HSC Result) विद्यार्थी-पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. याच संदर्भात आज मोठी माहिती समोर आली आहे. दहावी बारावीचा (SSC-HSC Result) निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

यंदाच्या दहावी-बारवीच्या (SSC-HSC Result) निकाला संदर्भात थोडा संभ्रम होता. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सुमारे 30 हजार सदस्यांनी म्हणजेच विनाअनुदानीत शिक्षकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणार नाही, असा आक्रमक पवित्रा विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी घेतला आहे. शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या (SSC-HSC Result) परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता आहे.

नुकत्याच संपलेल्या दहावी आणि बारावीचा परिक्षांचा (SSC-HSC Result) निकाल ठरलेल्या वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच निकालासंदर्भात पुढील आढवड्यात बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com