Anil Deshmukh
Anil Deshmukh

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; तपास आता सीबीआय करणार

Published by :
Published on

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी सुरू असलेला तपास आता सीबीआयकडे (CBI Investigate) देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील चौकशी सीबीआयकडून (CBI Investigate) केली जाणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambeer Singh) यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे (Sachin waze) आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख (Anil Deshmukh) यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Cm Uddhav Thackeray) पाठवलेल्या पत्रात केले होते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला होता.

दरम्यान, आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा ताबा सीबीआयकडे (CBI Investigate) देण्यात आला आहे. सीबीआयच्या टीमने (CBI Investigate) मुंबईतील आर्थर रोड तुरुंग जाऊन देशमुख (Anil Deshmukh) यांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे त्यांची पुढील चौकशी सीबीआयकडून (CBI Investigate) केली जाणार आहे. अनिल देशमुखांचा ताबा सीबीआयकडे गेल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगात पडले होते, त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर देशमुखांवर जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com