महाराष्ट्र
अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले; सचिन वाझेचा गंभीर आरोप
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.वाझे यांच्या नियुक्तीसाठी दोन कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता सचिन वाझेनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझेने या पत्रात केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे याने लिहिले आहे. ते पत्र आता NIA कोर्टाल दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.