Megablocks on all three railway lines on Sunday
Megablocks on all three railway lines on Sunday

मध्य रेल्वेचा 12 तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ मार्गावर लोकल उशीरा धावणार

Published by :
Team Lokshahi
Published on

मध्य रेल्वे (Central Railway) कडून रविवारी 27 मार्च दिवशी दिवा स्थानकामध्ये तांत्रिक कामं (Technical work) करण्यासाठी 12 तासांचा मेगाब्लॉक (Megablock) जाहीर करण्यात आला आहे. या रविवारी ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान (Thane to Kalyan station) अप आणि डाऊन फास्ट अशा दोन्ही मार्गिकामवर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकामधून सुटणार्‍या फास्ट लोकल सकाळी 7.55 ते रात्री 7.50 या वेळेत मुलुंड आणि ठाणे, कल्याण स्टेशन मध्ये डाऊन स्लो ट्रॅक (Slow track) वर चालवल्या जाणार आहेत. तर कल्याण मधून सुटणार्‍या अप फास्ट लोकल सकाळी 8.36 ते रात्री 7.50 या वेळेमध्ये कल्याण ते मुलुंड स्थानकादरम्यान अप स्लो ट्रॅकवर वळवल्या जाणार आहे. त्यामुळे काही लोकल 10-15 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे कडून हार्बर मार्गावर (harbor route) ठाणे-वाशी अप-डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 26 मार्च दिवशी रात्री 11.45 ते 27 मार्चच्या पहाटे 5.45 अर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी, नेरूळ, पनवेल, दरम्यान अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) यंदा रविवार 27 मार्च दिवशी मेगाब्लॉक नसेल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com