कॉंग्रेस हायकमांडचा पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; नाना पटोले आरोपांवर म्हणाले…दोन प्रधानमंत्री गमावलेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहेत. या निकालावर पंजाब सरकार आणि केंद्र सरकारला झापले असताना सुप्रीम कोर्टाने झापले असताना देखील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.आता कॉंग्रेस हायकमांड वरील आरोपांवर नाना पटोले यांनी आम्ही आमचे दोन प्रधानमंत्री गमावलेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हलगर्जीपणा चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. नाना पटोले यांनी गोंदिया येथे प्रचार सभे दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट कॉंग्रेस हायकमांड आणि पंजाब सरकारने रचल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिम्मत विस्वा शर्मा यांनी केले. या आरोपावर कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले. ही सर्व चमचेगिरी आहे. प्रधानमंत्री पद हे गरिमेचे आणि अभिमानाचे पद आहे. याचा दुरुपयोग कुठेही होऊ नये. आम्ही आपले दोन प्रधानमंत्री गमावलेत. म्हणून सुरक्षितते बाबत कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणा चालणार नाही असे ते म्हणाले.
भाजपचा सर्वा नौटंकीपणा आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे वर्ग केले असून ज्या प्रमाणे केंद्रीय गृहमंत्री यांनी पंजाब DJP यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.ही जी घाई आहे संमजण्यासारखी आहे. त्यामधूनच खुप समजण्यासारखे आहे.
प्रधानमंत्री दौऱ्याचे सर्व सुरक्षेचे निरीक्षण सर्व काही केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. मात्र ज्या दिवशी प्रधानमंत्री दौरा असतांना ऐनवेळी रस्ता बदलण्याचे कारण भाजप आणि अमित शहा अजूनही सांगू शकले नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.