Maharashtra Corona | महाराष्ट्रात ३६,२६५ कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचे ७९ रुग्ण

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ३६,२६५ कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचे ७९ रुग्ण

Published by :
Published on

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तर ओमायक्रॉनचे ७९ रुग्ण आढळून आले आहेत. या घटनेने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्याच आजपर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या आता ६७ लाख ९३ हजार २९७ इतकी झाली आहे. राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १४ हजार ८४७ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७९ हजार २६० रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

आध दिवसभरात एकूण ८ हजार ९०७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्या बाधितांचा आकडा ६५ लाख ३३ हजार १५४ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९६.१७ टक्के इतका आहे. आज एकूण १३ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता १ लाख ४१ हजार ५९४ झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर २.०८ टक्के आहे.

ओमायक्रॉनच्या ७९ रुग्णांची भर

ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ७९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता ७७६ इतका झाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये मुंबईत ५७, ठाण्यात ७, नागपूरमध्ये ६, पुण्यात ५, पुणे ग्रामीणमध्ये ३ तर पिंपरी चिंचवडमध्ये एका बाधिताची नोंद झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com