विमा कंपन्यांना लवकर काम करण्याच्या सूचना

विमा कंपन्यांना लवकर काम करण्याच्या सूचना

Published by :
Published on

विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नोंदवलेल्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचं काम फार हळु सुरू आसल्याने संबंधित कंपन्यांना कामाची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देल्या आहेत.

सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक, कृषि आयुक्तालय विकास पाटील, मुख्य सांख्यिकी कृषि आयुक्तालय विनयकुमार आवटे, बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नाईक व संबंधित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com