LPG Gas Cylinder | पुणे तिथे काय उणे, घरगुती गॅस सिलिंडर मधुन गॅसची चोरी

LPG Gas Cylinder | पुणे तिथे काय उणे, घरगुती गॅस सिलिंडर मधुन गॅसची चोरी

Published by :
Published on

विनोद गायकवाड , प्रतिनीधी

सध्या सर्वकडे पेट्रोल डीझेल घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती गॅसच्या वाढत्या दरामुळे ग्राहक हैराण झाले असून त्यात आता गॅसची चोरीच्या प्रकरणात भर पडली आहे. हा प्रकार घडलाय पुण्यातील दौंड या भागात.

दौंड शहरात गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडून शहरातील यादव वस्ती जवळ भरलेल्या घरगुती एचपी गॅस सिलिंडर मधुन दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीमध्ये मशीनच्या सहाय्याने धोकादायक पध्दतीने गॅस भरताना सहाय्य पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या टीमने रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 9 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर यामध्ये वाहने आणि 37 भरलेल्या टाक्या आणि 33 रिकाम्या गॅसच्या टाक्या जप्त केल्यात संबंधित टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मात्र दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

पाहा कशा प्रकारे होते गॅस सिलिंडर मधून चोरी

काय आहे या व्हिडीओ ?
या व्हिडीओमध्ये भारत पेट्रोलियमचा एक गॅस वितरक एका घरगुती गॅस सिलिंडर मधुन गॅसची चोरी करुन दुसऱ्या गॅसमध्ये टाकताना दिसत आहे. हे गॅस पुरवठा वितरक गॅस ग्राहकांना दोन किलो वजनाचा गॅस कमी देत असल्याने ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि 5 जणांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com