पुत्रप्राप्ती बाबत वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्या पुन्हा अडचणी वाढणार…

पुत्रप्राप्ती बाबत वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्या पुन्हा अडचणी वाढणार…

Published by :
Published on

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल झाली आहे, पुत्रप्राप्ती बाबत केलेल्या व्यक्त्यव्यावरून संगमनेर सत्र न्यायालयानं इंदोरीकर महाराजानां दिलासा दिला होता पण आता अंनिस (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) आणि सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये.

इंदोरीकर महाराज यांनी किर्तनात पुत्र प्राप्ती बाबत वक्तव्य केल होत. अंनिसने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात महाराजांनी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर संगमनेर जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्त्तता ही केली होती.

यानंतर 'आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे, असं म्हणत अनिसने निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यांनतर सरकारी पक्षाच्या वतीनेही जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिल गेल आहे. गुरवारी सरकारी पक्षाच्या वतीने खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com