Eknath Khadse | एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु
पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावलं आहे. या समन्सनंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते सकाळी पत्रकार परिषद घेणार नसल्याची माहिती होती. तसेच ते चौकशीलाही सामोरे जाणार नाही अशी शक्यता होती. मात्र आता त्यांनी चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.
जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.
आतापर्यत माझी ५ वेळा चौकशी झाली आहे. ईडी चौकशीच्या हेतुवरच मला संशय असल्याचा आरोप त्यांनी केला. कसेही करून मला अडवल पाहिजे असा मला संशय असून राजकीय हेतूपोटी माझी चौकशी होतेय असाही गंभीर आरोप केला. मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान आता खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. लवकरच त्यांच्या चौकशीला सुरुवात होणार आहे.