महाराष्ट्र
युट्युबवरून बनवला बॉम्ब… आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं!
नागपूरच्या नंदनवन भागातील एका युवकाने युट्युबवरून बॉम्ब सदृष्य वस्तू बनवल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच नाही थांबलं, तर हा बॉम्ब निकामी करता न आल्याने या व्यक्तीने थेट पोलीस स्टेशन गाठलंय.
नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन या व्यक्तीने संबंधित बॅग बेवारस असल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
नक्की का घडलं?
बॉम्ब सदृष्य वस्तू घेऊन एक तरुण चक्क पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्याजवळ खराखुरा बॉम्ब असल्याची बातमी पसरली. यामुळे पोलीसही हादरले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बिडीडीएस) पाचारण करण्यात आले. बरेच परिश्रम केल्यानंतर संबंधित वस्तू निकामी करण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्यात शनिवारी हे थरारनाट्य घडले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात राहुल युवराज पगाडे (वय २५) नामक आरोपी राहतो.