मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे याचा उद्या पहिला मेळावा होणार आहे. दादर साने गुरुजी विद्यालयात होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. उद्या सायंकाळी ७ वा. मेळावा होणार आहे. उद्याच्या मेळाव्यातून अमित ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार. माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिंदे यांच्या सेनेकडून सदा सरवणकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आहेत रिंगणात.

सुजय विखेंची पुन्हा संगमनेरात सभा; टायगर अभि जिंदा हैचा पुन्हा नारा

सुजय विखेंची पुन्हा संगमनेरच्या हिवरगाव पावसा येथे सभा घेत बाळासाहेब थोरात यांना डिवचल आहे व पन्हा टायगर अभि जिंदा हैचा पुन्हा नारा दिला आहे.या सभेलाही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 13 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात मनसेची ही तिसरी यादी जाहीर झालेली आहे. नाशिकचे दिनकार पाटील यांना याठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे.

राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसींना बिश्नोई गँगकडून धमकी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आता थेट विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आलेत. त्याबरोबरच खा. ओवेसी यांना देखील बिश्नोई याने धमकी दिल्याची माहिती समोर येतेय. राहुल यांना फेसबूकच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय आहे. एका फेसबूक अकाऊंटवरुन ही धमकी देण्यात आलीय, त्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख बदलली, या तारखेला भरणार अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदे अर्ज दाखल करणार आहेत.

कोकणामध्ये भाजपला मोठा धक्का! माजी आमदार बाळ माने यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश

कोकणामध्ये भाजपला मोठे धक्के देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी सध्या सुरू केलेला आहे. याआधी सुद्धा सिंधुदुर्गमधून राजन तेली यांनी ठाकरे गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. आता रत्नागिरी मधील भाजप माजी आमदार बाळ माने यांनी आज ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला. त्यांना सुद्धा एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आलाय. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहेत.आपल्या नक्कीच विजय होईल तसेच उदय सामंत कोकणामध्ये काही केलं नाही असा दावा बाळ माने यांनी केलाय.

बाबा सिद्दिकी प्रकरणी आणखीन एकाला अटक

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे. अमित हिसमसिंग कुमार नावाच्या 29 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. अमित कुमार हरियाणाचा रहिवाशी असून गुन्ह्यात सहभाग असल्याच निश्चित झाल्यानंतर अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 11 वर आहे.

पाथरी विधानसभेत महायुतीत बिघाडी; शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच बंड

पाथरी विधानसभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार गटात मोठी घडामोड सुरू झालीय. पाथरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी AP गटाने आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांना जाहीर झाल्याने शिवसेनेकडून इच्छुक असलेले अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बंड पुकारालाय. पाथरीची जागा शिवसेनेची हक्काची असून सुद्धा राष्ट्रवादीकडे गेल्याने सईद खान यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सईद खान 29 सप्टेंबरला मोठ्या शक्तिप्रदर्शनात आपला अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केलीय. यावेळी सईद खान याना भरून आले. आमदार राजेश विटेकर यांनी माझं राजकारण संपवण्याचा घाट घातल्याच सईद खान म्हणाले.

चंद्रपुरात 24 दारू दुकानांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात दारूची विक्री MRP दरात होते की नाही या साठी तीन दिवस राबविलेल्या मोहिमेत २४ दारू दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यात २० देशी दारू दुकान, १ वाईनशॉप, ३ बियर शॉपी यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी विसंगतीचे गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन अधीक्षक यांनी दिली.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित

माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजचा दुसरा दिवस आहे. या दिवशी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतलेत. हे दोन्ही अर्ज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठीच घेण्यात आले आहेत. त्यामुळे अभिजीत पाटलांची शरद पवार गटाकडुन उमेदवारी निश्चित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com