Lokshahi marathi news live updates
Lokshahi marathi news live updates

14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

Published by :
Team Lokshahi
Published on

14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

कॉंग्रेसची 14 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोणत्या उमेदवारांची नाव आले आहेत याची उत्सुकता आहे. अमरेळमधून अनिल शिंदेना उमेदवारी देण्यात आली आहे. पंढरपूरमधून भगिरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अंधेरी वेस्टमधून सचिन सावंत यांच्या जागेवर आता अशोक जाधव यांच नाव समोर येत आहे. सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती यामध्ये बदल करुन पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होत. त्यामुळे आता सचिन सावंत जागेवर आता अशोक जाधव यांच नाव जाहिर केलं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून आजी माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कुडाळ मालवण येथून निलेश राणे यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याचसोबत चेंबूर येथून तुकाराम काते यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. दिंडोशी मधून संजय निरुपम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वरळीतून मिलिंद देवरा यांच्या नावाचा घोषणा करण्यात आलेली आहे.

मनसेची सहावी यादी जाहीर, 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश

मनसेची सहावी यादी समोर आली आहे. या यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मनसेने स्वबळाची नारा देच पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि आता सहावी यादी जाहीर केली आहे.

9 उमेदवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून या यादीची घोषणा करण्यात आलेली आहे. या यादीत नऊ उमेदवारांचा समावेश असून यात मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद झिरार अहमद यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

पुण्यात भाजपला मोठा धक्का! उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश

उज्वल केसकर भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पुण्यात भाजपला मोठा धक्का मिळणार आहे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत उज्वल केसकर स्वराज्य पक्षाकडून कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा समोर आली आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार

कॉंग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील जनतेला न्याय देणारा हा जाहीरनामा असेल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितल आहे. तर "झुट बोलो दबा के खाओ" ही भाजपची भूमिका आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. 10 वर्षामध्ये देशाला लुटलं महाराष्ट्राला कर्ज बाजारी केलं असा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, विधानसभेआधी माजी मंत्र्याचा पक्षप्रवेश

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

भिवंडी पूर्व विधानसभासाठी ठाकरे गट आक्रमक; सर्व पदाधिकारी मातोश्री कडे रवाना

समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीत पाच जागांची मागणी केलेली आहे आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रईस शेख यांची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाने भाजपाने आलेल्या संतोष शेट्टी यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली.

त्यामुळे 2019 मध्ये अवघ्या 1314 मतांनी पराभूत झालेले शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांची गोची झाली आहे. शिवसेनेतील बंडा नंतर रुपेश म्हात्रे हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले. परंतु त्यांची उमेदवारी अजून ही जाहीर न केल्याने शिवसैनिक आक्रमक असून सर्वांनी त्यांची उमेदवारी पक्षप्रमुख यांनी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आपल्या मागणी साठी सर्व शिवसेना पदाधिकारी मातोश्री कडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.

मविआला धक्का! ऑल इंडिया पँथर सेना 'परिवर्तन महाशक्ती'त

परिवर्तन महाशक्तीमध्ये आणखी एक पक्ष सहभागी झाला आहे. आज छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. मविआतून बाहेर पडत ऑल इंडिया पँथर सेना 'परिवर्तन महाशक्ती'त सोबत युती केली आहे. संभाजीराजेंच्या उपस्थितीत दीपक केदारांनी पाठिंबा दिला आहे.

NCP(SP) Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाकडून तिसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 9 उमेदवारांचा समावेश आहे. यानंतर आणखी 7-8 उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

निलेश राणे थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेकडून दुसऱ्या यादीत निलेश राणेंच्या नावाची घोषणा होणार आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातून राणेंना उमेदवारी मिळणार आहे.

पुण्यात राहुल गांधींचा रोड शो होणार

पुण्यात राहुल गांधी रोड शो करणार आहेत. पुणे काँग्रेसकडून राहुल गांधींना पत्र देण्यात आलं आहे. पुण्यातील मविआ उमेदवारांसाठी एकत्रित राहुल गांधीचा रोड शो होणार आहे. राहुल गांधींची सभा होणार नाही मात्र, रोड शोची तारीख लवकरच निश्चित होणार आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता आहे. माहीम, वरळी, शिवडीच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता. शिवसेनेनं मनसेला पाठिंबा द्यावा, काही मनसे नेत्यांची मागणी.

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर

विधानसभ निवडणुकीसाठी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

संमनेरमध्ये जयश्री थोरातांसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

संमनेरमध्ये जयश्री थोरातांसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. आचारसहिंतेंचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. संगमनेर पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेसं केलं होतं आंदोलन.

महायुतीत रिसोड मतदारसंघावरून पेच कायम

महायुतीमध्ये रिसोड मतदारसंघावरून पेच कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून दोघे तर शिवसेनेकडून एक जण इच्छुक आहे. भाजपकडून अनंतराव देशमुख, विजय जाधवांचा दावा आहे. शिवसेनेकडून भावना गवळी उमेदवारीसाठी आग्रही आहेत. रिसोड मतदारसंघाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे.

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट', भाजपचे ट्वीट

'लाडकी बहिण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट' असल्याचे भाजपकडून ट्विट करत काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला. भाऊबीजचा संदर्भ देत भाजपने महिला मतदारांना साद घातली आहे.

वर्षभरात अमेरिकेत 90 हजार बेकायदेशीर प्रवेश केलेल्या भारतीयांना अटक

वर्षभरात अमेरिकेत 90 हजार भारतीयांना अटक केली. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून अटकेत असलेल्या लोकांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक गुजराती असल्याची माहिती आहे.

पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. पुणे शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांचा पक्षाचा राजीनामा केलायं. राजीनामा देण्याची कारणे नमूद करून पक्षाच्या सचिवांना पत्र पाठवले आहे.

भाजप नेते सत्यजित कदम शिवसेनेच्या वाटेवर?

भाजप नेते सत्यजित कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सत्यजित कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार

काँग्रेसचा जाहीरनामा 30 तारखेला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा सर्वाना न्याय देणारा असणार असल्याचे ही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; नऊ प्रवासी जखमी

वांद्रे टर्मिनसवर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी

वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १वर चेंगराचेंगरी

चेंगराचेंगरी दुर्घटनेत ९ जण जखमी

जखमींवर भाभा रुग्णालयाच उपचार सुरु

वांद्रे-गोरखपुर एक्सप्रेस पकडण्यासाठी झाली होती गर्दी

जखमींमध्ये २ जण गंभीर

देवेंद्र भुयार यांचं महायुतीतून पत्ता कट?

महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

वरुड-मोर्शी मतदारसंघातून आमदार देवेंद्र भुयार पुन्हा लढवतील अपक्ष निवडणूक आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जोरदार झटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख.

अंधेरी पश्चिमधून उमेदवारी दिल्यानं सचिन सावंत नाराज

काँग्रेस नेते सचिन सावंत वांद्रे पूर्वमधून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सचिन सावतांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मतदार संघ बदलून देण्याची सावतांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

इस्रायलकडून इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले

इस्रायलकडून इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले करण्यात आले होते. हल्ल्यामध्ये इराणचे दोन सैनिक ठार झाले आहेत. हिजबुल्लाकडूनही इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. इराण-इस्रायल हल्ल्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे.

कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने

कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने लढत पाहायला मिळणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर लढणार आहेत.

कोल्हापूर काँग्रेसच्या शहर कार्यालयावर मध्यरात्री दगडफेक

कोल्हापूर काँग्रेसच्या शहर कार्यालयावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली. 'चव्हाण पॅटर्न' लिहत अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. कोल्हापूर उत्तरच्या तिकिटाच्या वादातून घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

पुण्यात सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. महायुतीने ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने निर्णय घेण्यात आला आहे. सकल ब्राह्मण संघटनेनं पाठिंब्याचं पत्र जाहीर केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com