NCP Sharad Pawar fourth Candidate List; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर

NCP Sharad Pawar fourth Candidate List; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर

शरद पवार गटाकडून 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आलीये. नव्या यादीत 7 जणांना उमेदवारी जाहीर झालीये. यामध्ये माणमधून प्रभाकर गार्गे, काटोल इथून सलील देशमुख तर खानापुर - वैभव पाटील, वाई - अरुणादेवी पिसाळ, दौंड - रमेश थोरात, पुसद - शरद मैंद तसंच सिंदखेड विधानसभा मतरदारसंघातून संतोष बेडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

सुहास कांदे यांची शेखर पगार यांना फोनवरून शिवीगाळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते सुहास कांदे यांनी शेखर पगार यांना फोनवरून शिवीगाळ केली आहे. भाषण संपताच शेखर पगार यांना फोनवरून शिवीगाळ केली आहे. शेखर पगार यांनी भर सभेत शिवीगाळ ऐकवली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीला हडपसर भरभरून मतदान करेल आणि माझा विजय निश्चित आहे असं यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या किशनचंद तनवाणींची निवडणुकीतून माघार

किशनचंद तनवाणींनी निवडणुकीतून माघार घेतलीये. तनवाणी हे संभाजीनगर मध्यमधून ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार होते.मात्र एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून त्यांनी आता विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतलीये.

जुन्नरमधून महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. औक्षण झाल्यानंतर ओझर येथील गणपतीचं आणि किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेत त्यांनी रॅलीला सुरुवात केली.

सुमित वानखडे यांना आर्वीमधून भाजपची उमेदवारी

सुमित वानखडे यांना भाजपने आर्वीमधून उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डच्चू दिला आहे. सुमित वानखडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नांदेड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

नांदेड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. संतुक मारोतराव हंबर्डे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या 25 उमेदवारांसह पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून हंबर्डे यांची ओळख आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी

भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन करत शिवाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी राज्यमंत्री भरमु पाटील आणि कन्या शिवानी शिंगाडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

चंदगडमधील रवळनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन शिवाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शिवाजी पाटील यांच्या समर्थकांच्या घोषणेने चंदगड दुमदुमले

चंदगड मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील तर महाविकास आघाडी कडून नंदा बाभुळकर यांची उमेदवारी

शिवाजी पाटील यांच्या बंडखोरीने चंदगड मध्ये महायुतीत उभी फूट

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

मीरा-भाईंदरचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आज भाजपा आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवत संध्याकाळपर्यंत पक्ष त्यांना तिकीट देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अतुल बेनकेंकडून  उमेदवारी अर्ज दाखल

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ओझर येथील गणपतीचं आणि किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेत बेनकेंनी रॅलीला सुरुवात केली. या वेळी बेनकेंसोबत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय

चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी

भाजप नेते शिवाजी पाटील यांनी बंडखोरी करत चंदगढ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. माजी राज्यमंत्री भरमु पाटील आणि कन्या शिवानी शिंगाडे तसंच हजारो कार्यकर्त्यांसह मोठं शक्तिप्रदर्शन करत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. चंदगड मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील तर महाविकास आघाडी कडून नंदा बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आलीये. शिवाजी पाटील यांच्या बंडखोरीने चंदगड मध्ये महायुतीत उभी फूट पडलीये.

स्वराज्य पक्षाकडून गोपाळ लहांगेंना एबी फॉर्म

स्वराज्य पक्षाकडून संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गोपाळ लहांगे यांना एबी फॉर्म देण्यात आला. 'मविआ'नं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. गोपाळ लहांगे इंगतपुरीतून स्वराज्य पक्षाचे उमेदवार असणार आहेत.

BJP Third Candidate List :भाजपची तिसरी यादी जाहीर

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीतून 25 जणांना उमेदवारी करण्यात आली आहे. वर्सोव्यातुन भारती लव्हेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसच अनेक विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. कार्यअहवालात आव्हाड यांच्या अत्यंत जवळचा आणि जुना कार्यकर्ता असलेल्या युनूस शेख याचं नाव नसल्याने फोटो आणि नाव नसल्याने कार्यकर्त्यानी राडा केला आहे. मुंब्रामधील बैठक आणि पदाधिकारी मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. आव्हाड यांनी युनूस शेख यांना महाराष्ट्र अल्पसंख्यांक अध्यक्ष पद दिले. तसेच कार्यकर्त्याच्या मुलीला महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचं आश्वासन दिले आहे.

राज ठाकरे भांडुपमध्ये, शिरीष सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भांडुपमध्ये

राज ठाकरे भांडुपमध्ये मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com