शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नाही

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नसल्याची माहिती आपचे नेते संजय सिंह यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात मविआच्या प्रचारासाठी येणार आहेत. विलेपार्ले किंवा मलबार हिल विधानसभा आप लढण्याची शक्यता होती. मात्र त्या दोन्ही जागा ठाकरेंची शिवसेना लढणार आहे.

महायुतीत भाजपच मोठा भाऊ?

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? महायुतीत भाजपच मोठा भाऊ?

भाजप 153, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढणार- सूत्र

भाजपकडून पुन्हा एकदा 9 आकड्याचे गणित जुळणार

विश्वसनीय सूत्रांची माहिती

ठाकरेंच्या शिवसेनेची तिसरी यादी ठरली?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिसरी यादी तयार असल्याच्या चर्चा आहेत. वर्सोवामधून हारुन खान यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. तर विलेपार्लेमधून संदीप नाईकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. घाटकोपर पश्चिममधून संजय भालेरावांना उमेदवारी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दर्यापूरमधून गजानन लवटेंना AB फॉर्म दिल्याची माहिती मिळत आहे.

भारतानं सलग दुसरी कसोटी मालिका टेस्ट मॅच गमावली

भारतीय संघाने 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव झाला आहे. 245 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला आहे. याआधी भारताने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर करणयात आली आहे. या यादीतून 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून अधिकृत घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

पालघरच्या बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कंपनीत मोठा स्फोट

बोईसर तारापूर एमआयडीसीतील धार्मित रिसायकलिंग इंडस्ट्रीज या कंपनीत ब्लास्ट . ब्लास्ट मध्ये तीन कामगार गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी. बोईसर तारापूर एमआयडीसीतील ही प्लॉट नंबर जी 44 या कंपनीत ब्लास्ट . उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती . जखमींवर बोईसरच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू. पोलीस प्रशासनासह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

विदर्भात बच्चू कडूंना भाजपचा मोठा धक्का

विदर्भात बच्चू कडू यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनिल गावंडे यांनी प्रवेश केला आहे.

मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com