Latest Marathi News Updates live: 'लाडकी बहीण'ला 'महालक्ष्मी'ची टक्कर,'मविआ'च्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

Latest Marathi News Updates live: 'लाडकी बहीण'ला 'महालक्ष्मी'ची टक्कर,'मविआ'च्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

भिवंडी ग्रामीणमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात येणार.दुपारी ३ वाजता अंबाडीत उद्धव ठाकरे यांची दणदणीत जाहीर सभा होणार असून या सभेत विरोधकांचा काय समाचार घेणार याकडे भिवंडीवासीयांचे लक्ष.अंबाडी नाका येथे दुपारी ३ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन.

यवतमाळ जिल्ह्यात भरारी पथकाने वीस लाख रुपये केले जप्त

निवडणुक काळात शहरातील प्रमुख मार्गावर नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक विभागाच्या पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत चार चाकी आणि दुचाकी वाहनातून 20 लाख पन्नास हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आले. ही रक्कम कुठून आणि कशासाठी आणण्यात आली याचा शोध पोलीस पथकाकडून केल्या जात आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल केल्या जाते

गेवराई विधानसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात

विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली. दरम्यान ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झालीय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. जाहीर नाम्यात बारामतीकरांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहि‍णींना 2100 रुपये मिळणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-3 परिसरात आयकर विभागाची छापेमारी

वैजापुरात बाळासाहेब संचेती यांच्यानंतर विक्रम सुराणा यांच्या घरी देखील आयकर विभागाची छापेमारी मारली आहे. बाळासाहेब संचेती यांचे विक्रम सुरणा नातलग आणि वैजापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आहेत. वैजापूर को-ऑपरेटिव मर्चंट बँकेची संबंधित असलेल्या जालना आणि वैजापूरसह छत्रपती संभाजी नगर शहरात आयकर विभागाची छापेमारी सुरू

पुन्हा 370 कलम लागू करण्याचा ठराव

जम्मू काश्मीरच्या नव्या विधानसभेत पुन्हा 370 कलम लागू करण्याचा ठराव मांडण्यात आलाय. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी ठराव मांडलाय. या ठरावाला भाजप आमदारांकडून विरोध करण्यात आलाय.

दैनिक 'सामना'चे जीमेल, यूट्युब चॅनल हॅक

दैनिक 'सामना'च्या वेबसाईटचे जीमेल अकाऊंट तसेच यूट्युब चॅनेल हॅक करण्यात आले आहे. यानंतर सामनाची वेबसाईट देखील हॅक होण्याची शक्यता असून त्यावरून हॅकर चुकीच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ किंवा अफवा पसरविण्याचे प्रयत्न करू शकतात.

अमेरिकेच्या निवडणुकीत 277 इलेक्ट्रोल मतं मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत विजय झालाय. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. कमला हॅरिस यांना २२४ इलेक्ट्रोल मतं मिळाली तर ट्रम्प यांना २७७ इलेक्ट्रोल मतं मिळाली. अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती म्हणून ट्रम्प यांच्यावर शिक्कामोर्तब.

मविआकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर

महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची आज मुंबई बिकेसी येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित आहेत. या सभेत मविआकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आलं आहे.

मविआकडून महाराष्ट्राला 5 गॅरेंटी

महालक्ष्मी योजनेतून महिलांना ३ हजार देणार

महिलांसाठी मोफत बससेवा

युवकांना ४ हजार देणार

कुटुंबासाठी २५ लाखांचा आरोग्य विमा

शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार

महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेले- राहुल गांधी

भाजपमुळे देशात बेरोजगारी वाढली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली. भारतात सर्वात जास्त टॅक्स गरीब, छोटे दुकानदार देतात.

कराड उत्तर मतदार संघामध्ये अमित शहा यांची जाहीर सभा होणार

कराड उत्तर मतदार संघामध्ये डॉक्टर अतुल भोसले हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 8 नोव्हेंबरला जाहीर सभा पार पडणार आहे. 8 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता ही सभा कराड तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर या होणार आहे.

अजित पवारांकडून सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याचा समाचार 'साहेबांवर खालच्या पातळीवरील टीका खपवून घेणार नाही' अजित पवारांनी केला शरद पवारांचा बचाव

मविआच्या सभेनंतर सभास्थळी गोंधळ

मविआच्या सभेनंतर सभास्थळी गोंधळ झाल्याचं पहायला मिळालंय. कॉंग्रेस कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की झालीये. मात्र काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com