Latest Marathi News Updates live : बंडखोरी करणाऱ्यांची भाजपकडून हकालपट्टी; 40 जणांवर पक्षाची कारवाई

Latest Marathi News Updates live : बंडखोरी करणाऱ्यांची भाजपकडून हकालपट्टी; 40 जणांवर पक्षाची कारवाई

पुणे जिल्ह्यातील 53 मतदान केंद्रांच्या नावात बदल

पुणे जिल्ह्यातील 53 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. 29 मतदान केंद्रांच्या जागेत बदल केला असून मतदारांमधील संभ्रम टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंचा आज केज मतदारसंघात दौरा

केज मतदार संघातील निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आज बावची, भालगाव, सादोळा, रामवडगाव, सोनेसांगवी , लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी व माकेगाव या गावांना भेटी देणार

ऑलिम्पिकसाठी भारताला 2036चं यजमान पद मिळणार का?

ऑलिम्पिकसाठी भारताने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 2036 मध्ये होणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनासाठी 'आयओसी'ला पत्र पाठवण्यात आलं आहे.

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र कायम

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र कायम आहे. गेल्या 24 वर्षांत 30 हजार 727 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतमालाचे घसरलेले दर, दुष्काळ, गारपीटीमुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन कोटींचा माल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. महिनाभरात 96 वाहनांसह तीन कोटी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बच्चू कडू यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी अयशस्वी असल्याचं कबूल केलं असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. अभिमन्यू वक्तव्यावरून कडूंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. प्रहारचे उमेदवार जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे मनसे उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात

राज ठाकरे मनसे उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले असून अमरावती, लातूर, पंढरपूरमध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज विदर्भ दौऱ्यावर

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथांच्या विदर्भातील 3 मतदारसंघात प्रचारसभा होणार असून तिवसा,अकोला आणि वाशिम मतदारसंघात योगींच्या प्रचार जाहीर सभा होणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा

राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा असणार आहे. राहुल गांधी महाविकास आघाडीकडून प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून महाविकास आघाडीकडून आज लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com