आज किंवा उद्या भाजपचे निरीक्षक मुंबईत दाखल होणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत निरीक्षक असणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
पुण्यात मविआच्या पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ही बैठक होणार असून कायदेतज्ञ असीम सरोदे बैठकीत उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत.
नागपूरात चंद्रशेखर बावनकुळेंचा आज जनता दरबार पार पडणार असून कोराडीतील जनसंपर्क कार्यालयात बावनकुळेंचा जनता दरबार होणार आहे.
विधानसभेच्या यशानंतर भाजपाकडून महापालिकेची तयारी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या आठवड्यात विविध विकास कामाचा आढावा घेणार आहेत.
हिमाचल प्रदेशच्या जंगलात मोठी आग लागली असून कुल्लूच्या बडा भूईन पंचायतीच्या जंगलात ही आग लागली.
पुण्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याचा अति उच्च काळ संपलेला असल्याची माहिती मिळत असून चक्रीवादळाचा काळ संपल्यामुळे हिवाळ्याला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
महायुतीची विधिमंडळ पक्ष बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भाजपची बैठक पुढील 2 दिवसात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री निवडीची बैठकही लांबणीवर गेली आहे.
महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ समर्थकांकडून अनोख्या पध्दतीने आंदोलने करण्यात आले.
शिवसेना-भाजपकडून आमदारांना मुख्यमंत्रिपदाबाबत न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन कटुता येऊ नये म्हणून खबरदारी बाळगण्यात आली आहे.
ऑक्टोबर हिटने त्रासलेल्या मुंबईकरांना आज अखेर थंडीने दिलासा दिला आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. या हंगामातले आतापर्यंतचे हे निचांकी किमान तापमान आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज दुपारी 1 वाजता टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.
EVM विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.