विधानसभेच्या महानिकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं असून उद्या निकाल समोर येणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात उद्या 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 8 मतदारसंघांची मतमोजणी कोरेगावातील धान्य गोदामात होणार असून मतमोजणीसाठी पुणे प्रशासन सज्ज झालं आहे.
समीर वानखेडे यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून नवाब मलिक यांच्यावर दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेला सोपवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. दिल्लीत भाजप राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक बोलावली असून जे. पी. नड्डा महत्त्वांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.
सांगलीतील शाळगाव एमआयडीसीत वायू गळती झाली आहे. वायू गळती दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू तर हॉस्पिटलमध्ये 5 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
अदानी समूहाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. केनियाने विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्प रद्द केले आहेत.
इंदापुरात निकालाआधीच विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहे.
खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही परवानगीविना आंदोलन केल्याने शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असून ऑस्ट्रेलियाच्या संसदेत याबाबत विधेयक सादर
काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने थंडीचा कडाका वाढला असून बहुतांश भागातील किमान तापमानाची शून्याखाली नोंद झाली आहे.
उद्धव ठाकरेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फोन केला असून सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत फोन केल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकीच्या घोषणेआधीच आपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून आपकडून दिल्ली विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
मुंबईत उपनगरात किमान तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझमध्ये किमान तापमानाची 19 अंशाखाली नोंद झाली असून उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे.
पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला असून हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार असून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणेंचे विजयी बॅनर लावण्यात आले आहे. 'नाद करा.. पण आमचा कुठं?' असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला असून 'विकासाचा वादा, अजितदादा', असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता. निवडून येणाऱ्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येणार आहे. मतदानयंत्रांना स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आली असून स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मविआ, महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरु असून मविआच्या कालच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
महविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक असून आज दुपारी बैठक होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा आढावा आज पुन्हा घेतला जाणार