Lokshahi Marathi Rudra Exit Poll LIVE
Lokshahi Marathi Rudra Exit Poll LIVE

Lokshahi Marathi Exit Poll live: राज्यात ६ वाजेपर्यंत ६१.८४ मतदान टक्केवारी

यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बोथबोडण येथे रात्रीही मतदान

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान घेण्यात आले मंगळवारी जिल्ह्यातील 2,578 केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली.यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बोथबोडण येथे रात्रीही मतदान सुरू होते. मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

सिल्लोड येथे दोन गटांत कार्यकर्त्याची बाचाबाची, काही काळ तणावाचे वातावरण

विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील बाजार समिती परिसरातील एका मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उबाठाचे उमेदवार सुरेश बनकर याना मिळाल्याने त्यांनी वेळीच मतदान केंद्रावर येवून शहा निशा करण्यासाठी आले असता या ठिकाणी उपस्थित दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकांत त्याची बाचा बाची झाल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी काही जना मध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित जमाव पांगविला आहे.

राज्यात सत्तापालट होणार की महायुती सत्तेत कायम राहणार?

लोकशाही मराठी आणि रूद्र रिसर्च अनलॅटिक्सच्या एग्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला १२८-१४२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच महाविकास आघाडीला १२५-१४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष आणि इतर पक्षाला मिळून १८-२३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रायगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. रोह्यातील दूरटोली येथील मतदान केंद्रावर पत्नी वरदा आणि कन्या आदिती यांच्यासह मतदान केलं आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल. महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांचा मोठा सहभाग आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचा एकहाती विजय होईल, बारामतीकर नेहमी कामाला महत्व देत आहे. बारामतीच्या विकासात गेली 30 वर्षे अजित पवार यांचे मोठं योगदान आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर - ६१.९५टक्के,

अकोला - ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड - ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे - ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली - ६१.१८ टक्के,

जळगाव - ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर - ५६.०६ टक्के,

नांदेड - ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे - ५४.०९ टक्के,

रायगड - ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली - ६३.२८ टक्के,

सातारा - ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे - ४९.७६ टक्के,

वर्धा - ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील टक्केवारी

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सायंकाळी ०५. ०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

मतदारसंघ मतदान (अंदाजे)

१७८-धारावी - ४६.१५ टक्के

१७९सायन-कोळीवाडा- ५०.५४ टक्के

१८०- वडाळा – ५२.६२ टक्के

१८१- माहिम – ५५.२३ टक्के

१८२-वरळी – ४७.५० टक्के

१८३-शिवडी – ५१.७० टक्के

१८४-भायखळा – ५०.४१ टक्के

१८५- मलबार हिल – ५०.०८ टक्के

१८६- मुंबादेवी - ४६.१० टक्के

१८७- कुलाबा - ४१.६४ टक्के

नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी

नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी

सायंकाळी ५ वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ५६.०६  %

हिंगणा ५५.७९  %

कामठी ५३.४५ %

काटोल ५९.४३ %

नागपूर मध्य ५०.६७ %

नागपूर  पूर्व  ५५.९८ %

नागपूर उत्तर ५१.७०  %

नागपूर दक्षिण  ५३.३६  %

नागपुर दक्षिण पश्चिम ५१.५४ %

नागपूर पश्चिम ५१.८९ %

रामटेक  ६५. ५९ %

सावनेर  ६४.२३  %

उमरेड ६७.३७ %

मुंबई शहरात 10 पैकी 6 मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीने ओलांडली पन्नाशी

मुंबई शहरात 10 पैकी 6 मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीने ओलांडली पन्नाशी

माहीममध्ये सर्वाधिक 55.23 % मतदानाची नोंद

5 वाजेपर्यंत कुलाब्यात फक्त 41.64% मतदान

यंदाही कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी मतदान

ठाणे जिल्ह्यात मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

ठाणे जिल्ह्यात 39.20 टक्के मतदान पूर्ण

ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपखाडी मतदार संघात सर्वाधिक मतदानाचा टक्का पाहायला मिळतोय

मुंब्रा कळवा - 38.20 टक्के

ठाणे - 39.41 टक्के

कोपरी पाचपाखाडी - 44.60 टक्के

ओवळा माजिवडा - 37.51 टक्के

मोहाडी येथे दोन गटात राडा.... पोलिसांचा चोख बंदोबस्त....

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा मतदार संघात मोहाडी येथील मतदान केंद्रावर दोन गटात राडा झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे, व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजु कारेमोरे यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. वाघमारे यांच्या कार्यकर्त्यांची चारचाकी गाडी मतदान केंद्राबाहेर ठेवण्यात आली. पण कारेमोरे यांच्या कार्यकर्त्यांची गाडी डायरेक्ट मतदान केंद्रात नेल्याने याचा जाब वाघमारे यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारताच दोन्ही कार्यकर्ता धक्का बुक्की झाली आहे. सद्या मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असुन पोलिसांनी प्रकरण हाताळला आहे.

पैठणमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम

पैठण विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असुन पैठण शहरात दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले होते यावेळी साह्यक निवडणुक निर्णय अधिकारी सारंग चव्हाण यांनी दिव्यांग मतदारांचे स्वागत केले यावेळी दिव्यांग मतदारांनी आपला दिव्यांग मतदानाचा हक्क बजावला.

सुकळी येथील सरपंचावर प्राणघातक हल्ला

उमरखेड मतदार संघात मतदान सुरू असताना उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज.) येथील भारतीय जनता पार्टीचे सरपंच शीवाजी रावते यांच्यावर तेथील विशिष्ट समुदायाच्या तरुणांकडून मतदान केंद्रावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

नंदुरबार जिल्ह्यातील चार वाजेपर्यंत चे मतदान

अक्कलकुवा 47.82%

शहादा 54.13%

नंदुरबार45.75%

नवापूर 57.52%

एकूण मतदान 51.12%

सातारा खंडाळ्यात मतदानकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू

सातारा खंडाळ्यातील मोरवे गावात धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करतानाच हृदयविकाराचा झटका आला आहे. मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शाम धायगुडे असे मतदानकर्त्याचे नाव असून शाम धायगुडे हे 67 वर्षाचे होते.

मुंबईत तृतीयपंथींनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला

मुंबईत तृतीयपंथी यांनी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आव्हान केला आहे.

कल्याण, डोंबिवली, 4 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी

कल्याण, डोंबिवली, 4 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी

दुपारी 3 वाजेपर्यंत झालेले मतदान,

1) कल्याण ग्रामीण विधानसभा - 40,87

2) कल्याण पश्चिम मतदारसंघ - 36,55

3) डोंबिवली मतदार संघ - 42,36

4) कल्याण पूर्व मतदार संघ - 37,31

चंद्रपूर मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

चंद्रपूर :- सकाळी १ ते ३ या कालावधीत मतदानाची टक्केवारी ४९. ८७ %

राजुरा - ५१.५२ टक्के

चंद्रपूर - ४१.४४ टक्के

बल्लारपूर - ४८.८२ टक्के

ब्रम्हपुरी - ५६.३४ टक्के

चिमूर - ५७.७९ टक्के

वरोरा - ४६.०९ टक्के

पंढरपूर मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी

पंढरपूर - 38.30 टक्के

सांगोला - 48.36 टक्के

माढा - 45.67 टक्के

माळशिरस - 45.14 टक्के

करमाळा - 42.40 टक्के

गडचिरोलीत केंद्राचे दरवाजे बंद, आत मतदान सुरू

गडचिरोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतच होती. त्यामुळं सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र 3 वाजेपर्यंत अनेकांचं मतदान होणं बाकीच होतं. त्यामुळे गेटबाहेर असलेल्या मतदारांना केंद्राच्या आवारात घेऊन गेट बंद करण्यात आले. बऱ्याच केंद्रांवर 3 वाजतानंतरही रांगा कायम होत्या. त्या सर्वांचे मतदान झाल्याशिवाय मतदान प्रक्रिया थांबविली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्पष्ट केले.

बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर - ४७.८५ टक्के,

अकोला - ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३ टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड - ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८ टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे - ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८ टक्के,

हिंगोली - ४९.६४टक्के,

जळगाव - ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर- ५४.०६ टक्के,

लातूर _ ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,

नागपूर - ४४.४५ टक्के,

नांदेड - ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६ टक्के,

नाशिक -४६.८६ टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे - ४१.७० टक्के,

रायगड - ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली - ४८.३९ टक्के,

सातारा - ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे - ३८.९४ टक्के,

वर्धा - ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७ टक्के,

यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

कराड विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी

कराड

दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

पाटण विधानसभा मतदार संघ -51.59

कराड उत्तर मतदार संघ - 52.03

कराड दक्षिण मतदार संघ - 52.56

दुपारचा सत्रात चांगल्या पद्धतीचे मतदान झालेले आहे मुंबई स्थित मतदार अद्याप पोहोचले नसल्याने सायंकाळी पाटण मतदार संघात मतदानाचा टक्क्यात उचकी वाढ होऊ शकते

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील वडविहीरा या त्यांच्या मूळ गावी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी

सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झालेली आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांसोबत भिडले असून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप आहे.पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा भाजपचा गंभीर आरोप आहे.भाजप कार्यकर्त्यांना दडपल्याने पोलिसांना लाड व दरेकरांनी जाब विचारला आहे.

मुंबईतील दहा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे 39.34 टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०३.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

मतदारसंघ मतदान (अंदाजे)

१७८-धारावी - ३५.५३ टक्के

१७९सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के

१८०- वडाळा – ४२.५१ टक्के

१८१- माहिम – ४५.५६ टक्के

१८२-वरळी – ३९.११ टक्के

१८३-शिवडी – ४१.७६ टक्के

१८४-भायखळा – ४०.२७ टक्के

१८५- मलबार हिल – ४२.५५ टक्के

१८६- मुंबादेवी - ३६.९४ टक्के

१८७- कुलाबा - ३३.४४ टक्के

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात तीन वाजेपर्यंत 46.18% मतदान

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात तीन वाजेपर्यंत 46.18% मतदान

- दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 59.33% मतदान

- सर्वाधिक कमी मतदान नाशिक पूर्व मध्ये 38.94%

नागपूर जिल्हा विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी

दुपारी ३:00 वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ४४.४५ %

हिंगणा   ४३.३८ %

कामठी ४३.२४ %

काटोल  ४३.२० %

नागपूर मध्य ४१.१० %

नागपूर  पूर्व ४४.९७ %

नागपूर उत्तर ४१.०१  %

नागपूर दक्षिण ४३.४०  %

नागपुर दक्षिण पश्चिम ४१.७६ %

नागपूर पश्चिम ४०.९३ %

रामटेक ५१.१८  %

सावनेर ५०.३८ %

उमरेड  ५४.०४ %

भिवंडी विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी

भिवंडी*

सकाळी 07.00 ते 3.00 वाजेपर्यंत मतदान

134 भिवंडी ग्रामीण - 47.45%

136 भिवंडी पश्चिम - 34.20%

137 भिवंडी पूर्व - 35.77%

सांगली - 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी

सांगली - 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी ( 3 वाजे पर्यंत )

मिरज - 43.98 %

सांगली - 43.86 %

इस्लामपूर - 54.84 %

शिराळा - 54.41 %

पलूस - कडेगाव - 50.16 %

खानापूर - 46.63 %

तासगाव कवठेमहांकाळ - 49.33 %

जत - 45.93 %

सांगली जिल्ह्याची टक्केवारी 48.39 %

उद्योगपती अंबानी कुटुंबीयांनी सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला आहे.

भारताचे नावाजलेले उद्योगपती अंबानी कुटुंबीयांनी सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला आहे.

काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसेन यांनी बजावला आपला मतदानाचा हक्क

आज मतदानाच्या दिवशी प्रत्येक नेत्याकडून त्यांचा मतदानाचा हक्क बजावला जात आहे. तर मीरा-भाईंदर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसेन यांनी देखील त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

धुळे जिल्ह्यातील मतदार संघ निहाय टक्केवारी

धुळे जिल्हा वेळ 11- 1

जिल्हा टक्केवारी -

मतदार संघ निहाय टक्केवारी -

१) धुळे शहर - 29.97

२) धुळे ग्रामीण - 33.38

३) शिंदखेडा - 33.18

४) शिरपूर - 38.41

५) साक्री - 35.36

मध्य नागपूर मधील काँग्रेस उमेदवारांनी पैसे वाटप केल्याचं भाजपचा आरोप.

मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या भावाने पक्ष कार्यालयात पैसे वाटप केल्याची माहिती दिली आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर पोलीसाकडून आणि निवडणूक विभागाकडून कारवाई केली गेल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 100 महिलांना कार्यालयात बोलावून पैसे वाटप केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा करण्यात आला आहे.पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जखमी उमेदवार हॉस्पिटल मधून थेट मतदानासाठी केंद्रात दाखल

करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी प्रचार संपवून परत येत असताना घोरपडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. रात्री त्यांना डिस्चार्ज मिळाला तर त्यांनी गगनबावडा तालुक्यातील लखमापूर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

दहशत नेमकी कुणाची हे वरिष्ठांना आता कळाल पाहिजे - धनंजय मुंडे

बीडच्या परळी मतदारसंघात घाटनांदुर येथे थेट वोटर मशीन फोडून गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आला आहे. आता याच विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. या प्रकारा विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान

गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

भोसरीतील 7 हजार 500 मतदारांची नावं गायब?

भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं डिलीट झाल्याचं अन हडपसर, बारामती अशा विविध विधानसभेत नावं टाकल्याचा, दावा मतदारांनी केला आहे. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. ही साडे सात हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मतदार संघाची टक्केवारी

वेळ 7 ते 1

मतदार संघ टक्केवारी

1) सिल्लोड - 43.85

2) कन्नड- 35.71

3) फुलंब्री -34.89

4) वैजापूर- 30.72

अभिनेत्री माधुरी दीक्षितने जुहूच्या मतदारसंघात बजावला मतदानाचा हक्क

सर्वत्र प्रसिद्ध अशी धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत जिने आपली अदा दाखवली आहे अशा अभिनेत्री माधुरी दीक्षितने जुहूच्या मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात पैसे वाटप करणारी गाडी पकडली...

नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडले. साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉ.रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या असून एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टपावर उभे राहून नोटा फाडल्या आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल ; गाडी कोणाची व पैसे कोणाचे ही चौकशी सुरु आहे.

अमरावतीत पैसे देऊन व्होट घेतले जातानाचा प्रकार समोर

अमरावतीच्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात पैसे देऊन व्होट घेतले जातानाचा प्रकार समोर आला आहे. मेळघाट मधील खाऱ्या टेम्बरू येथील पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकुमार पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे देऊन राजकुमार पटेल यांना मतदान करण्याची विनंती केली जात आहे. एका दुकानाच्या समोर बसून हा कार्यकर्ता पैशाचं वाटप करतानाचा व्हिडिओ पुढे आला आहे. यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

युवा नेते जयदादा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क..

युवा नेते जयदादा पवार यांनी देखील मतदान केलं आहे. तर बारामती शहरातील जळोची येथील मोरोपंत शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचसोबत जनतेला आव्हान देत मतदानाचे महत्त्वे देखील स्पष्ट केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यानंतर ते संपूर्ण आपल्या विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रात जाऊन लोकांची भेट घेत आहेत आणि जास्तीत जास्त मतदान व्हावा यासाठी आव्हाने देखील करत आहेत.

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी बजावला मतदानाचा अधिकार

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी वाशीमधील गोल्ड क्रिश शाळेत मतदानाचा अधिकार बजावला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ ,सुंदर आणि पारदर्शक राज्य घडवण्यासाठी नागरिकांनी न विसरता मतदान करावे.

संजय शिरसाट धमक्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून संजय शिरसाठ या व्हिडिओमध्ये धमक्या देत असून त्यांच्यावर निवडणूक आयोग आणि पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपला मतदानाचा अधिकार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपला मतदानाचा अधिकार गाजवला आहे. त्याचसोबत आशा भोसले यांचं मतदारांना आवाहन देखील आहे. मी मतदान केलंय, तुम्ही करा सुट्टी आहे म्हणून घरी बसू नका, मत द्या असं आव्हान आशा भोसले यांच्याकडून करण्यात आलेलं आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण दुबईवरून ठाण्यात

ठाण्यातील ओमकार भोसले हा दुबईला असलेला मुलगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मतदान करण्यासाठी चार दिवसाची सुट्टी काढून ठाण्यामध्ये आला आणि मतदान केले.

मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत

मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत ही घटना कोल्हापूरात घडली आहे. दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राधानगरीमधील बर्गेवाडी गावातील घटना समोर आली आहे. उमेदवार के पी पाटील यांनी आक्षेप घेण्यात आले आहे. तांत्रिक चूक दुरुस्त करून मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान पूर्ववत आहे.

मतदानासाठी कलाकांनी बजावला आपला हक्क 

विधानसभा निवडणुकीसाठी चित्रपटसृष्टी मतदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये हिंदी सिनेसृष्टीतीलल कलाकारांचा चांगलाच सहभाग पाहायला मिळाला आहे. हेमा मालिनी, ईशा देओल, कार्तिक आर्यन यांच्यासह राकेश रोशन यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. तर मतदान करत असताना त्यांनी जनतेला मतदान करण्याचे आव्हान केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. तर त्यांनी जनतेला मतदान करण्याचे आव्हान केले आहे.

पुनीत बालन यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला

बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जानवी धारिवाल बालन यांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कस्तुरबा गांधी शाळेत जाऊन त्याने आपला अधिकार बजावला लोकशाही वाढवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं अस आव्हान देखील पुनीत बालन यांनी केल आहे.

शतायुषी मतदारांचा उत्साह तरुणांनाही मागे टाकणारा

नेपियन सी मार्ग येथील रहिवासी व ११३ वर्षे वय असलेल्या श्रीमती कांचनबेन नंदकिशोर बादशाह तसेच ग्रँट रोड येथील रहिवासी असणारे आणि वय वर्षे १०३ असलेले श्री. जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना शतायुषी मतदारांचा उत्साह तरुणांनाही मागे टाकेल, असा ठरतो आहे.

परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला

बीडच्या परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांनी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण केली आहे. परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत देखील बोगस मतदान होत असल्याचा आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला होता याचा व्हिडिओ देखील माध्यमांसमोर आणण्यात आला. आता राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना अशी मारहाण होताना दिसून येत आहे.

बारामती मतदान केंद्राबाहेर गोंधळ

बारामतीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ पाहायला मिळत आहे. 'बारामतीत दमदाटी करुन बोगस मतदान' युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवारांकडून आरोप करण्यात आलेला आहे. यादरम्यान शर्मिला ठाकरेंचा बालक मंदीर मतदान केंद्राजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आलेला आहे.

अभिनेता समीर चौगुले यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनी मराठी या वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेता समीर चौगुले यांनी दहिसर मतदारसंघात मतदान केले असून त्यांनी मतदानाबाबत जनतेला मतदान करण्याचे आवाहान केले आहे.

अजित पवार गटाच्या नेत्याचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल...

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या मतदान करण्यासाठी पैसे वाटताना चा व्हिडिओ समोर आला आहे, तर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी या घटनेचा निषेध केला असून या संदर्भात आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार करत असल्याचे सांगितलं आहे.

नाशिकमध्ये राडा, सुहास कांदे आणि समीर भुजबळ आमनेसामने

समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्या नंतर मोठा राडा झाला आहे. सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने बजावला आपला मतदानाचा हक्क

मतदानाच्या धामधूमीत मराठी कलाकारांचा चांगला सहभाग पाहायला मिळत आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी तिने लोकांना मतदान करा असं आव्हान देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

आज मतदानाच्या दिवशी सर्वत्र मतदान केल जात आहे. याचपार्श्वभूमीवर धारावीच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

उद्योजिका आणि चित्रपट निर्मात्या उषा काकडे यांनी मतदानांचा हक्क बजावला आहे.

उद्योजिका आणि चित्रपट निर्मात्या उषा काकडे यांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रत्येकानी योग्य व्यक्तीला मतदान केल पाहिजे असं आवाहन उषा काकडे यांनी केल आहे.

मुनगंटीवार यांनी बजावले मतदानाचे हक्क

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बल्लारपूर क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी धर्मपत्नी सपना, मुलगी शलाका यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाण्यासाठी जोरदार प्रचार केल्याच पाहायला मिळालं आहे. त्यांच्या प्रचाराला मतदार किती साथ देतात, हे निकलांती कळेलच, मात्र त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच बटेंगे तो कटेंगे, या नाऱ्याचा पुनरुच्चार केल्याच पाहायला मिळालं आहे.

सोलापुरच्या जागेमुळे महाविकास आघाडीत मतभेद

सोलापुरच्या जागेमुळे महाविकास आघाडीत मतभेद झालेला पाहायला मिळत आहे. प्रणिती शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का लागलेला दिसून येत आहे. 'काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंच्या सेनेचे लोक मतदान करणार नाहीत' असा सोलापुरात भाजप नेते प्रविण दरेकरांचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे. ठाकरेंना धक्का देण्याचे काँग्रेसचे नियोजन असल्याचे तसेच काँग्रेसला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सज्ज झालेत असा दावा प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

नारायण राणे यांनी पत्नी व दोन सुनांसह केले मतदान

नारायण राणे यांनी पत्नी व दोन सुनांसह सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान केले आहे. नितेश आणि निलेश दोन्ही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. विनोद तावडेंसारख्या एका पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांच्यासह खडसे कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे तसेच एकनाथ खडसे यांची मुलगी शारदा खडसे यांनी कोथळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदानाचा हक्क बजावला आहे.

शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापुरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. न्यूपॅलेस परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत येऊन मतदान केलं आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकारी असा विश्वास त्यांनी शाहू महाराजांनी व्यक्त केला.

सना मलिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

सना मलिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत, लोकांना जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करण्याचा आव्हान केला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी शुभा खोटें मतदान करण्यासाठी जात असतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यावधींची चांदी जप्त

धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यावधींची चांदी जप्त करण्यात आली आहे. धुळ्यातील थाळनेर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली असून जवळपास 94 कोटी रुपयांची चांदी कंटेनरमध्ये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबईच्या तुर्भेत राऊटर्स सापडे, हॅकिंगसाठी साहित्य आणल्याची राजकीय पक्षांना शंका

शिवाजी नगर तुर्भे येथे मिळाले गाडीत राईटरचे सामान आढळले आहे. संबधीत सामान इव्हीएम मशीन हॅकींग साठी आणले आहे का याची राजकीय पक्षांना शंका आहे. मात्र सदरचे सापडलेले सामान हे शिवाजी नगर मधील मोबाईल टॅावर योग्य रित्या सुरू आहेत का हे चेक करणारी सिस्टम असल्याचा पोलीसांची माहिती.

शंभूराज देसाई यांनी मरळी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी मरळी येथील आपल्या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. महायुतीतील नेत्याचा पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे तथ्य नाही त्याचा कोणताही परिणाम महायुतीला होणार नाही.यात शंका येत आहे महायुतीला बदनाम करण्यासाठी कोणी षडयंत्र रचले आहेका याचा पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे.

धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यावधींची चांदी पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यावधींची चांदी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेली आहे. धुळ्यातील थाळनेर परिसरात पोलिसांकडून तशी कारवाई करण्यात आहे. जवळपास 94 कोटी रुपयांची चांदी कंटेनरमध्ये असल्याचा अंदाज बेंगलोरकडे जात होता. कंटेनर बँकेची चांदी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला, घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केलय..यावेळी प्रत्येकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बसवला पाहिजे , यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे यांनी म्हंटले आहे.

विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सहपरिवार जाऊन बजावला मतदानाचा हक्क

अंमळनेर तालुक्यातील हिंगणा या गावात विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या सहपरिवारासह येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. अनिल भाईदास पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून पैसे वाटप असे खोटे आरोप त्या महायुतीवर करत आहे आणि शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असाही खोचक टोला मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी लगावला आहे.

नवनीत राणा व रवी राणा दुचाकीने मतदान केंद्रावर दाखल

बडनेरा मतदार संघाचे आमदार व महायुतीचे उमेदवार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा हे आपल्या बडनेरा मतदार संघातील शंकर नगर येथील मतदान केंद्रावर दुचाकीने मतदान केंद्रावर दाखल झाले आहे तत्पूर्वी निवासस्थानी नवनीत राणा व रवी राणा यांच्या आईने रवी राणा यांच औक्षण केल त्या नंतर राणा दाम्पत्य मतदान केंद्रावर दुचाकिने गेले व मतदान आहे.

आबा बागुलांनी बजावला मतदानाचा हक्क

पर्वती विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केल मतदान. कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क आहे. आबा बागुल पर्वती विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत.

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदानाच्या या रणधुमाळीत आज सर्वत्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी आपल्या सहकुटुंबासह बांद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे देखील पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानाच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मदतदाना हक्क बजावला आहे. ठाण्यातील मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान केले आहे.

धुळ्यात पैसै वाटणाऱ्या तरुणाला नागरिकांचा चोप

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असून याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता पोलिसांनी शिवाजी हायस्कूल परिसरात दाखल होत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच यावेळी सदर पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला मतदान केंद्रावर असणाऱ्या नागरिकांनी चांगलाच तो देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे...

आपल्या नम्रतेने जयदादा पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले, दादांचा लेक लाखात एक..

अजितदादा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मतदानाच्या धामधुमीत धावपळ सुरू असताना समोरून आलेल्या काका श्रीनिवास पवार यांना नमस्कार केला, गळाभेट घेतली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष सुरू असताना जय पवार यांनी दाखवलेली विनम्रता, त्यांच्यावरील दिसून आलेले संस्कार उपस्थितांची मने जिंकुन गेले. अजितदादा व सुनेत्रा वहिनी यांनी मोठ्यांचा आदरच करायचा ही दिलेली शिकवण किती घट्ट आहे, हेही या निमित्ताने दिसून आले. त्यातून दादांचा लेक लाखात एक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमठत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रात मशीनवर मतदान केल्याचा व्हिडिओ 

मतदान केंद्रात मशीनवर मतदान केल्याचा व्हिडिओ तथा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा प्रकार संभाजीनगरात समोर आलाय, इंस्टाग्राम वर दिनेश लोंढे पाटील या खात्याच्या माध्यमातून मतदान देत असतानाचा व्हिडिओ आणि फोटो बनवून सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे..

विक्रोळी विधानसभेत सुनील राऊत यांची गुंडगिरी ला नागरिक त्रस्त असल्याची प्रतिक्रिया

विक्रोळी विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाचे सुनील राऊत यांची लढत शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे यांच्याशी आहे. कारंजे यांनी कांजूरमार्ग येथील पालिका शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील, राऊत यांची गुंडगिरी ला नागरिक त्रस्त असल्याची प्रतिक्रिया दिली.

हसन मुश्रीफ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर इथल्या विद्यामंदिर मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

समरजित घाटगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी शिंदेवाडी तालुका कागल येथे मतदानाचा हक्क बजावला.

चक्क घोड्यावर बसून मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे आज मतदारांनी घोड्यावर बसून येऊन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी असे त्यांना म्हटलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी निरगुडसर या त्यांच्या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन वळसे पाटील यांनी मतदारांना केले.

सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

मतदान टक्केवारी, सकाळी 9 वाजेपर्यंत

नागपूर (सरासरी) - 6.86%

- हिंगणा - 5.32 %

- कामठी - 6.71

- काटोल - 5.20

- मध्य - 6.14

- पूर्व - 8.01

- उत्तर - 3.54

- दक्षिण - 8.40

- दक्षिण -पश्चिम - 8.92

- पश्चिम - 7.50

- रामटेक - 6.71

- सावनेर - 7.25

- उमरेड - 8.98

शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

शरद पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. बारामती मधील माळेगाव बुद्रुक मधील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कुल मध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

राहुल कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क

दौंड विधानसभेचे भाजप उमेदवार राहुल कुल यांनी राहू मधील मतदान केंद्रावर पत्नी कांचन कुल आणि मातोश्री माजी आमदार श्रीमती रंजना कुल यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी ते पार पाडावे असे आवाहन मतदारांना केले.

खासदार धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापुरातल्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर खासदार धनंजय महाडिक यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

गिरीश महाजन यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क

जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सकाळी आठ वाजता गिरीश महाजन यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क विद्यमान मंत्री गिरीश महाजन हे आपल्यासह परिवारासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे

मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी अजित पवारांना घेतला आईचा आशीर्वाद. फोटो सोशल मीडियावर शेअर

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपाचे आमदार आणि सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आटपाडीतल्या आपल्या पडळकरवाडी येथे गोपीचंद पडळकरांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांनी कुटुंबियांसमवेत केले मतदान

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांनी कुटुंबियांसमवेत मतदान केले. रविंद्र चव्हण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आहेत. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.

भरत गोगावले यांनी मतदानाचा हक्क बजावला

महाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रचारात घेतलेली मेहनत आणि केलेली विकास कामे या बळावर विजय होईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.

नबाब मलिक यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला

नबाब मलिक यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून लोकशाही बळकट करणे हे लोकांच्या हातात आहे आणि मतदानाचा अधिकार लोकांनी वापरला पाहिजे असं नवाब मलिक यांनी आमच्या प्रतिनिधी मिनाक्षी म्हात्रे यांच्याशी बातचीत करताना प्रतिक्रिया दिली आहे.

'सगळ्यांनी या आणि मतदान करा' सचिन तेंडुलकर यांचं जनतेला अवाहन

सगळ्यांनी या आणि मतदान करा. निवडणूक आयोगाचा मी ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मी गेला वर्षभर मतदान करण्यासाठी आवाहन करतोय आणि आज देखील मी तेच करेन. सोयी सुविधा चांगल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी येऊन आवर्जून मतदान करावे.

कोल्हापुरात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने गोंधळ

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी पार्क इथल्या विक्रम हायस्कूल येथे केंद्र क्रमांक 90 मध्ये व्ही व्ही पॅट मशीन बंद पडल्याने एकच गोंधळ उडाला या ठिकाणी कोल्हापूर उत्तर चे उमेदवार राजेश लाटकर यांनी भेट देऊन माहिती घेतली तांत्रिक विकास झाल्याने हे मशीन बंद पडलं असून या ठिकाणी दुसरे मशीन लावण्यात आलं मात्र हे होत असताना जवळपास अर्ध्या तासाचा कालावधी गेल्याने या ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्यास पाहायला मिळालं.

Vidhan Sabha election 2024 Live: राज्यात महायुतीचे सरकार येणार- चंद्रकांत पाटील

राज्यात महायुती चे सरकार होणार. आम्ही नक्की जिंकू आम्हाला विश्वास आहे, अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.विनोद तावडे यांच्यावर झालेला आरोप खोटा आहे. त्यांच्या विरोधात सापळा रचला गेला. एखाद्याच्या माणसाला आयुष्यातून उठवताय का?, असं त्यांनी म्हटलं आहे.

अभिनेते सुभोध भावे यांनी बाजवला मतदानाचा हक्क

अभिनेते सुभोध भावे यांनी बाजवला मतदानाचा हक्क पुण्यातील गुजराती शाळेत बजावला कुटुंबा समवेत मतदानाचा हक्क प्रत्येक निवडणुकीला सुबोध भावे हे न चुकता आपला मतदानाचा अधिकार बजावत असतात

अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात अद्यापही मतदानाला सुरुवात नाही

अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातील वाडेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 208 वर अद्यापही मतदानाला सुरुवात नाही. मशीन मध्ये तांत्रिक बिघाडामुळे अजूनही मतदानाला सुरुवात नाही. मतदानाला सुरुवात झाली नसल्याने या ठिकाणी मतदारांची मोठी रांग मतदान केंद्रावर लागली आहे. मतदानाची ही वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मात्र मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी ही वेळ वाढवून देणार नसल्याचा म्हणलाय तर लवकरच तांत्रिक बिघाड दूर करून मतदानाला सुरुवात होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहेय.

जळगावच्या जामनेरमध्ये EVMमध्ये बिघाड

जळगावच्या जामनेरमध्ये EVMमध्ये बिघाड झाला असून 15 ते 20 मिनिटानंतर मतदान प्रक्रियेला सुरवात झाली.

पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद

पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद.अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम पाऊण तासापासून बंद असल्याची माहिती.

उदय सामंत यांनी  मतदारांसोबत रांगेत उभे राहत बजावला मतदानाचा हक्क

मोहन भागवत यांना बजावला मतदानाचा हक्क

सर्वांनी मतदान करा, अजित दादांकडून आवाहन 

अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. याचसोबत त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

अमित देशमुखांची बजावला मतदानाचा अधिकार

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि दुसऱ्या टप्प्यात आज 12 जिल्ह्यांतील 38 जागांवर मतदान होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान

धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात 66 उमेदवार रिंगणात उतरले असून 1523 मतदान केंद्रावर होणार मतदान प्रक्रिया होणार आहे.

विधानसभा मतदानामुळे आज जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद

विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला असून आज रोजी मतदान होणार आहे या दिवशी जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समिती व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे या बाजार समिती अंतर्गत होणारी एक दिवसाची पंधरा कोटीची उलाढाल यानिमित्ताने ठप्प होईल एकट्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला एक कोटी पेक्षा जास्त उलाढाल होते या बाजार समिती अंतर्गत मसावद व कानडदा या उपबाजार समिती देखील बंद राहणार आहे

शिवसेनेच्या शायना एनसी यांनी घेतलं मुंबादेवीचे दर्शन

शिवसेनेच्या शायना एनसी यांनी घेतलं मुंबादेवीचे दर्शन घेतलं आहे. शायना एनसी या शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार आहेत. मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना केली आहे.

शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला

मतदान काही तासावर आले असताना छत्रपती संभाजी पश्चिमचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाठ यांच्या गाडीवर आज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांचा मुलगा सिध्दांत शिरसाट गाडीत असताना हा प्रकार घडला. माझ्यावर झालेला हल्ला हा विरोधात उभे असलेले उमेदवार राजु शिंदे यांनी केला आहे असा आरोप संजय शिरसाट यांनी लावला.

थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी आज मतदान होणार असून थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी आज मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी आज मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 23 तारखेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com